संवेदनशील आणि साक्षेपी लेखक आणि नाटककार गमावला - अमित देशमुख

Update: 2021-08-29 06:29 GMT

ज्येष्ठ लेखक, समीक्षक, नाटककार, पत्रकार जयंत पवार याचं वयाच्या 61 व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या निधनाची बातमी कळताच राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

"साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक, नाटककार जयंत पवार यांच्या निधनामुळे आपण संवेदनशील आणि साक्षेपी लेखक आणि नाटककार गमावला आहे. त्यांनी नेहमीच रंगभूमीवर काहीतरी वेगळे आणण्याचा प्रयत्न केला", असे ट्विट करत सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी जयंत पवार यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

जयंत पवार यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने घेतलेल्या नाट्यलेखन स्पर्धेत 'काय डेंजर वारा सुटलाय' या नाटकासाठी जयंत पवार यांना सर्वोत्कृष्ट लेखनाचे प्रथम पारितोषिक मिळाले होते.

२०१४ ला महाड येथे झालेल्या १५व्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या साहित्य संमेलनाचे जयंत पवार हे अध्यक्ष होते. जयंत पवार यांना त्यांच्या 'फिनिक्सच्या राखेतून उठला मोर' या कथासंग्रहासाठी २०१२ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता.

Tags:    

Similar News