China plane crash: चीनचं विमान कोसळलं, व्हिडीओ व्हायरल

चीनमध्ये विमान दुर्घटना झाली असून त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

Update: 2022-03-22 04:45 GMT

चीनमध्ये एका विमानाचा मोठा अपघात झाला आहे. या अपघाताचे व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ईस्टर्न पॅसेंजर विमान (Eastern Passenger Plane Crash) डोंगराळ भागात कोसळले. या विमानात प्रवाश्यासंह 137 लोक प्रवास करत होते. या विमान अपघाताचे भयावह व्हिडीओ फुटेज समोर आले आहे. हा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

चीनच्या नागरी उड्डान प्रशासनाने या संदर्भात माहिती दिली आहे. बोईंग 737 विमान कुनमिंग सिटीहून ग्वांगझूकडे जात असताना गुआंग्शी प्रदेशातील वुझोऊवर त्याचा "हवेतच संपर्क तुटला". बचाव पथकाला आतापर्यंत कोणीही जिवंत असल्याचा पुरावा मिळालेला नाही.

फ्लाइट ट्रैकर FlightRadar24 वर आलेल्या माहितीनुसार हे विमान केवळ 2.15 मिनटात 29,100 फुटांवरून 9,075 फूट उंचीवर कोसळले. सामान्यपणे इतकं अंतर पार करण्यासाठी ३० मिनिटं लागतात.

विमान वेळेवर लॅन्ड न झाल्याने माध्यमांमध्ये विमान कोसळल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. विमान कोसळलेल्या भागातील लोकांनी कोणी जिवंत आढळले नसल्याचं म्हटलं आहे

Tags:    

Similar News