चेंबूर लसीकरण: 'मॉ' हॉस्पिटलमध्ये सोशल डिस्टसिंगचा फज्जा

Update: 2021-04-27 08:48 GMT

सध्या राज्यात 45 वर्षापुढील लोकांना कोरोनाची लस दिली जात आहे. मात्र, लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणात लोकांच्या रांगा लागल्या असून या रांगेत सोशल डिस्टसिंगचा फज्जा उडाला आहे. चेंबूरमधील महानगरपालिकेच्या 'मॉ' हॉस्पिटलमध्ये लोकांनी लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.

या संदर्भात लसीसाठी आलेल्या एका महिलेने मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना मी लस घेण्यासाठी आले होते. आम्हाला 1 वाजता बोलावले होते. मी 12 वाजताच आले. आम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं आहे. मात्र, आज लस मिळाली नाही. या ठिकाणी सोशल डिस्टंसिंग ठेवलं जात नाही. असं सदर महिलेने मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना सांगितलं.

या गर्दी संदर्भात हॉस्पिटलचे डीन डॉ. संजय डोळस यांच्याशी आम्ही बातचीत केली. त्यांनी आमच्याकडे पनवेल, ठाणे यासारख्या भागातून लोक लसीकरणासाठी येत आहेत. आमची 300 लसींची कॅपेसिटी आहे. तरीही आम्हाला जितके लसीचे डोस मिळतात. ते आम्ही देत आहोत. पुढे ही गर्दी होऊ नये. म्हणून खालच्या आवारातच मंडप टाकून लसीकरण केलं जाणार आहे. सध्या याची तयारी सुरु आहे.

अशी माहिती डॉ. संजय डोळस यांनी दिली आहे.

Tags:    

Similar News