प्रतीसरकारच्या तुफान सेनेचे कॅप्टन रामभाऊ लाड काळाच्या पडद्याआड

क्रांतीसिंह नाना पाटील यांनी स्थापन केलेल्या प्रतिसरकारच्या तुफान सेनेचे कॅप्टन असलेले रामभाऊ लाड यांचे निधन झाले.;

Update: 2022-02-06 03:40 GMT

क्रांतीसिंह नाना पाटील यांनी स्थापन केलेल्या प्रतिसरकारच्या तुफान सेनेचे कॅप्टन असलेले रामभाऊ लाड यांचे निधन झाले.

जेष्ठ स्वातंत्र्यसैनित असलेले आणि स्वातंत्र्यलढ्यात प्रत्यक्ष सहभाग घेत क्रांतीसिह नाना पाटील यांच्या प्रतिसरकारचे कॅप्टन पद भुषवलेले रामभाऊ लाड यांचे निधन झाले.

क्रांतीसिंह नाना पाटील यांनी ब्रिटीशांच्या जुलमी जाचाला कंटाळून त्यांच्याविरूध्द प्रतिसरकारच्या माध्यमातून मोठे आव्हान उभे केले होते. त्या काळात क्रांतीसिंह नाना पाटील यांची प्रतिसरकार मोठ्या प्रमाणावर ब्रिटीशांच्या रेल्वे खजनिन्यापासून ते कार्यालयांपर्यंत लुट करत होते. रेल्वेच्या पटऱ्या उचकावणे, जुलमी अधिकाऱ्यांना वठणीवर आणणे, ब्रिटीशांच्या सरकारला आव्हान देत सामान्य लोकांचे सरकार चालवण्याचा क्रांतीसिंह नाना पाटील यांनी प्रयत्न केला होता. तर यामध्ये क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या प्रतिसरकारमुळे ब्रिटीशांना सळो की पळो असे झाले होते. या क्रांती सिंह नाना पाटील यांच्या लढ्यात सक्रीय सहभाग घेतलेले तुफान सेनेचे कॅप्टन रामभाऊ लाड यांचे निधन झाले. त्यांनी गोवा मुक्तीसंग्रामासोबतच हैद्राबाद मुक्तीसंग्रामातही सक्रीय सहभाग नोंदवला होता. तर गोवा आणि हैद्राबाद मुक्तीसंग्रामाच्या माध्यमातून त्यांनी महत्वपुर्ण योगदान दिले होते.

तुफान सेनेचे कॅप्टन रामभाऊ लाड यांच्यावर तासगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र वयाची शंभरी पार केलेल्या रामभाऊ लाड यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. तसेच रविवारी दहा वाजता कॅप्टन रामभाऊ लाड यांचा कुंडल येथे अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे.



Tags:    

Similar News