दरवर्षी पुरामुळे पाण्याखाली जाणाऱ्या पुलामुळे 15 गावांना फटका

Update: 2020-08-12 08:57 GMT

पालघर जिल्ह्यातील विरार पूर्व भागातील पांढरतारा बंधारा दर पावसाळ्यात पाण्याखाली जातो. त्यामुळे पंचक्रोशीतील १० ते १५ गावांचा वसई तालुक्याशी असलेला संपर्क किमान दोन ते तीन दिवस तुटतो या पुलाची उंची कमी असल्यामुळे नवा पूल बांधण्यात यावा अशी मागणी गावकरी गेल्या २० वर्षांपासून करत आहेत. पणसंबंधित विभाग त्यावर कार्यवाही करत नसल्याचे स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

हे ही वाचा...

उद्धव ठाकरे, तुम्हाला आणि तुमच्या मुलाला लवकरच राजीनामा द्यावा लागेल: भाजप नेत्यांचं ट्विट

राज्याचा मृत्यूदर ३.४२ % वर, 0 % वर कधी येणार?

रशियाच्या कोरोना विरोधातील लसीवर प्रश्नचिन्ह? काय आहे वास्तव?

दर पावसाळ्यात नवसई, भाताणे,आडणे, थळ्याचा पाडा, या गावांसह अनेक आदिवासी पाड्यावरील ग्रामस्थांना अतोनात हाल सहन करावे लागतात. तानसा नदीवर असलेल्या पुलावर पाणी आले की या सर्व गावांचा तालुक्याशी असलेला संपर्क तुटतो. हा पूल कमी उंचीचा आहे. त्याजागी जास्त उंचीचा पूल बांधण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थ गेली अनेक वर्षे करत आहेत. पण जिल्हा परिषदेचा सार्वजनिक बांधकाम विभाग त्याची दखल घेत नाही, अशी गावकऱ्यांची तक्रार आहे. त्यामुळे या गावांमधून शहरी भागात ये-जा करणाऱ्या महिला, चाकरमानी व शाळा-महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना पावसाळ्यात सक्तीची रजा घ्यावी लागते.

या संदर्भात आमदार राजेश पाटील यांनी संपर्क साधला तेव्हा, “ हा पूल जुना असून त्याची उंची वाढवणे शक्य नाही, तर नवीन पूल उभारण्यासाठी आवश्यक असलेली जमीन देण्यास ग्रामस्थ तयार नाहीत. त्यामुळे हे काम रखडले आहे, “ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Similar News