Home > News Update > राज्याचा मृत्यूदर ३.४२ % वर, 0 % वर कधी येणार?

राज्याचा मृत्यूदर ३.४२ % वर, 0 % वर कधी येणार?

राज्याचा मृत्यूदर ३.४२ % वर, 0 % वर कधी येणार?
X

राज्यात आज १० हजार १४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यात आतापर्यंत एकूण ३ लाख ६८ हजार ४३५ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ६८.७९ टक्के एवढे झाले आहे. आज राज्यात ११ हजार ८८ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे, राज्यात सध्या १ लाख ४८ हजार ५५३ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली.

राज्यात आज २५६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. सध्या राज्यातील मृत्यूदर ३.४२ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २८,३७,५७८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५,३५,६०१ (१८.८७ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

सध्या राज्यात १०,०४,२३३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर ३५,६४८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Updated : 12 Aug 2020 8:46 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top