उद्धव ठाकरे, तुम्हाला आणि तुमच्या मुलाला लवकरच राजीनामा द्यावा लागेल: भाजप नेत्यांचं ट्विट

30

सुशांत सिंह राजपूत प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. या प्रकरणी आता सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख सर्वोच्च न्यायालयामध्ये झाल्याचा दावा भाजप नेते निलेश राणे यांनी केला आहे.

काय म्हटलं निलेश राणे यांनी..

“उद्धव ठाकरे तुमच्या मुलाचं नाव सुप्रीम कोर्टाच्या रेकॉर्ड मध्ये आले, की आदित्य ठाकरेचा सुशांत सिंग राजपूतच्या केस मध्ये सहभाग जाणवतो. तुम्हाला आणि तुमच्या मुलाला लवकरच राजीनामा द्यावा लागेल कारण ह्या केस मध्ये तुम्ही आणि तुमच्या मुलाने पदाचा दुरुपयोग केला आहे,” असं ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे.

Comments