मुंबईची नालेसफाई, 'त्या' व्हिडिओ वरुन सत्ताधारी टार्गेट

Update: 2020-06-04 04:13 GMT

एकीकडे मुंबई कोरोनाशी लढत असताना निसर्ग चक्रीवादळाचे (Nisarga Cyclone) फटकाही मुंबईला (Mumbai) काही प्रमाणात बसला. त्याचवेळी मुंबईत पुरेशी नालेसफाई झाली नसलाचा आरोप करत भाजपचे (BJP)नेते राम कदम (ram kadam)यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध केला.

यात एका दाटवस्तीच्या भागातून नाल्याचे पाणी वेगाने वाहत असल्याचे दिसत आहे. राम कदम यांनी ट्विट करत सरकारवर टीका केली आहे. " नालेसफाईचा महापालिकेचा दावा एका दिवसात फोल, आता आम्ही आरोप करतो असे म्हणू नका" असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm Uddhav Thackeray) यांना लगावला आहे.

 

 

हे ही वाचा...


'निसर्ग'चा जोर ओसरला, आता मुसळधार पावसाचा अंदाज

एक व्हाट्सअप मेसेज, ... मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलतोय!

...म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मानले सर्वांचे आभार

दरम्यान हा व्हिडिओ जुना असल्याचे काहींनी म्हटल्यावर तोच व्हिडिओ रिट्विट करत राम कदम यांनी व्हिडिओमध्ये मास्क बांधलेले लोक दिसत नाहीत का असा प्रश्न विचारला आहे.

दरम्यान राम कदम यांच्या या ट्विटवर विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी मुख्यमंत्र्यांना टॅग करत मुंबईत दयनीय अवस्था झाल्याची टीका केली आहे.

 

Similar News