एक व्हाट्सअप मेसेज, … मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलतोय!

Uddhav Thackeray writes to PM Modi over cancellation of examinations

कोरोना प्रादुर्भावामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. अशात Positive रुग्णाला लक्षणं असताना 10 दिवस Admit न करणे धक्कादायक आहे. मात्र, ही बाब मुख्यमंत्र्यांना समजल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याची तात्काळ दखल घेत स्वत: कॉल करुन रुग्णावर तात्काळ उपचार करण्याचे आदेश दिले. मुख्यमंत्र्यांच्या आदेशा नंतर सध्या रुग्णांवर उपचार सुरू असून मुख्यमंत्र्यांच्या या कार्यतत्परतेबद्दल समाधान व्यक्त होत आहे.

याबाबत पत्रकार अलका धुपकर यांनी एक व्हायरल व्हाट्सअप श्रमजीवी संघटनेचे विवेक पंडित यांना पाठवला होता, या नंतर पंडित यांनी वस्तुस्थिती पडताळून याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना संपर्क साधला. मुख्यमंत्री ठाकरे यांनी काही मिनिटातच प्रतिसाद देत त्या रुग्णाला दाखल करून उपचार सुरू करण्याची व्यवस्था केली. या तत्परतेबाबत पंडित यांनी समाधान व्यक्त करत मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहे.

एका दिव्यांग मित्राची व्यथा मांडणारी एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या अंध दिव्यांग व्यक्तीला 17 मे रोजी कोरोना सदृश लक्षणे होती, याबाबत त्याने प्रथम एका खाजगी रुग्णालयात तपासणी केली, वारंवार सांगूनही डॉक्टरांनी त्याचे काहीही न ऐकता सर्दी खोकल्याची औषधे देत परत पाठवले. मित्रांनी कोविड हेल्पलाईनला संपर्क करून त्याची कोरोना टेस्ट व्हावी. म्हणून विनंती केली होती. अथक प्रयत्नांनी या हेल्पलाईनवर संपर्क झाल्याचे या मित्रांनी पोस्ट मध्ये सांगितले आहे.

माहिती दिल्यानंतरही 2 दिवस टेस्ट झाली नाही. त्यानंतर टेस्ट झाल्यावर ती पॉसिटीव्ह आल्यानंतरही त्याला दाखल करायला रुग्णवाहिका यायला 24 तास उलटले. दरम्यान त्याचे पूर्ण कुटुंबीय त्याच्यासोबत बराच काळ संपर्कात आले.
रुग्णालयात दाखल केल्यानंतरही तिची विदारक स्थिती कायम होती. सरकारने ताब्यात घेतलेल्या खाजगी हॉस्पिटलकडून त्याला पुन्हा खर्चाचे कारण देत सरकारी हॉस्पिटलमध्ये पाठवण्याचा विचित्र अनुभव या पोस्ट मध्ये होता. अन्न, पाणी, मदत आणि उपचारविना असलेल्या या असह्य मित्रासाठी दोन मित्रांनी केलेला हा फेसबुक मॅसेज व्हाट्सअपच्या माध्यमातून पत्रकार अलका धुपकर यांनी श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांना पाठवला.

विवेक पंडित यांनी हा मेसेज मिळताच प्रथम पोस्ट टाकणारे आणि स्वतः रुग्णांशी बोलणे केले, याबाबतच्या वस्तुस्थितीची खात्री केली. त्यानंतर याबाबत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तसेच संबंधित अधिकारी, महापालिका आयुक्त यांना याबाबत माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी तातडीने याची दखल घेत, त्यांचे विशेष कार्य अधिकारी सुधीर नाईक यांच्यामार्फत पाठपुरावा सुरू केला. याबाबत काही तासातच या रुग्णाला वसईतील गोल्डन पार्क हॉस्पिटलमध्ये दाखल करून उपचार सुरू करण्यात आले.

एकूणच या पूर्ण प्रक्रियेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः दाखवलेले तत्परता उल्लेखनीय आहे. अशी कोणतीही अडचण अथवा आपत्कालीन स्थिती असल्यास मला थेट संपर्क करावा. मी स्वतः लक्ष घालेन असेही मुख्यमंत्र्यांनी विवेक पंडित यांना सांगितले. पंडित यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मनःपूर्वक आभार मानले.