Home > News Update > 'निसर्ग'चा जोर ओसरला, आता मुसळधार पावसाचा अंदाज

'निसर्ग'चा जोर ओसरला, आता मुसळधार पावसाचा अंदाज

निसर्गचा जोर ओसरला, आता मुसळधार पावसाचा अंदाज
X

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या निसर्ग चक्रीवादळाचा फटका रायगड आणि अलिबागला बसला. पण मुंबईत येण्याआधी या वादळाचा जोर ओसरल्याने सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास सोडला. या वादळाचा जोर कमी झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. पण त्याचबरोबर पुढील २४ तासात महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील काही भागांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. रायगड, नंदुरबार, धुळे आणि नाशिक जिल्ह्याच्या काही भागांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दरम्यान चक्रीवादळामुळे पुणे जिल्ह्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी झाले आहेत. त्याचबरोबर सुमारे शंभर कच्च्या घरांचे नुकसान झाल्याची माहितीही पुणे जिल्हा प्रशासनाने दिली आहे. तर तीन प्राण्यांचाही मृत्यू झाला आहे. तीव्र वादळाच्या शक्यतेने किनारी भागात सरकारने जय्यत तयारी करुन ठेवल्याने जीवितहानी टाळता आली. मुंबईतही खबरदारी घेण्यात आली होती, त्यामुळे मोठे नुकसान टाळता आले.

Updated : 4 Jun 2020 1:36 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top