…म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मानले सर्वांचे आभार

Chief minister of Maharashtra Uddhav thackeray
Courtesy : Social Media

आज राज्यावर ‘निसर्ग ‘ चक्री वादळाचं मोठं संकट आलं होतं. मात्र, वेळीच काळजी घेतल्यानं या वादळाच्या तडाख्यातून मोठं नुकसान टळलं आहे. प्रशासनाच्या सतर्कतेमुळे मुंबई सह महाराष्ट्राचे रक्षण करणाऱ्या सगळ्यांचेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खास शब्दात आभार मानले आहेत.

काय म्हटलंय उद्धव ठाकरे यांनी?

“महाराष्ट्रावर करोनाचे संकट घोंघावत असतानाच चक्री वादळाचा तडाखा बसला. संकट म्हटले तर मोठे होते. पण हे संकट आपण सगळ्यांनी परतवून लावले आहे. जनता व प्रशासनाने झूंज दिली व संकटाची तीव्रता कमी केली. दुर्दैवाने दोन जीव अपघातात गेले. कोकणात तसेच इतरत्र नुकसान झाले आहे. या नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश दिले आहेत. मुंबा देवीचीच कृपा मुंबई वर आहे तशी पंढरपूरच्या विठु माऊलींचे आशीर्वाद आहेत. मुख्य म्हणजे या वादळाला थोपवून सामना करणारे महापालिका अधिकारी,जिल्हा प्रशासन,आपत्कालीन व्यवस्थापन, वैद्यकीय पथके या सगळ्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच. वृत्तवाहिन्या सुद्धा लोकांना चांगली माहिती देत होत्या. निसर्गा पुढे कोणाचेही चालत नाही. पण संकट काळात महाराष्ट्र एक आहे. खंबीर आहे हे या वादळात दिसुन आले.

हीच आपली एकजूट महाराष्ट्राला सर्व संकटातुन बाहेर काढल्या शिवाय राहणार नाही.
जय महाराष्ट्र
उद्धव ठाकरे