भाजपचं वीजबिल वीज बिल विरोधातील आंदोलन की कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी आमंत्रण?

आज राज्यभर भाजपचं वीज बिल वाढी विरोधातील आंदोलन झालं. मुंबईत झालेल्या आंदोलनादरम्यान झालेली गर्दी पाहता हे भाजपाचे आंदोलन कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी आमंत्रण तर देत नाही? असं चित्र होतं... मॅक्स महाराष्ट्राचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांचा ग्राऊंड रिपोर्ट...

Update: 2020-11-23 11:15 GMT

आज मुंबई भाजपच्या वतीने वाढीव विजबिला संदर्भात आंदोलन करण्यात आले हे आंदोलन मुंबईच्या प्रत्येक वॉर्ड मधून करण्यात आले होते त्यामुळे या आंदोलनात त्या वॉर्ड चे स्थानिक कार्यकर्ते हे जमलेले होते आणि काही आंदोलन ही आमदारांच्या नेतृत्वात झाली त्या आंदोलनामध्ये लोकांची आणि कार्यकर्त्यांची गर्दी ही खूप मोठ्या प्रमाणात होती.

काल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र च्या जनतेशी सवांद साधताना आपल्यावर घोंगावत असलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेविषयी आपल्याला माहिती दिली आणि सर्व जनतेला सतर्कतेचा ईशारा देत लोकांना कोरोना पासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे आणि त्रिसूत्री कार्यक्रम म्हणजे हात धुणे,मास्क घालणे आणि विनाकारण गर्दीत जाऊ नये हा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला आहे पण भाजपच्या वतीने आज आंदोलन करण्यात आले त्यात या कोणत्याच नियमांचं पालन होत आहे हे दिसूणच आलं नाही आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सल्ल्याला जनप्रतिनिधींनी केराची टोपली दाखवत नियम पायदळी तुडवत गर्दी जमा करून आंदोलन करत आहे.

विजेची लाईट बिल कमी कमी करण्याची मागणी ही भारतीय जनता पार्टीची रास्त मागणी आहे पण कोरोनाच्या दुसरी लाट ही परदेशात आली आहे त्यावर भारताला आणि महाराष्ट्राला सतर्क राहून लोकांच्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे पण इथे भारतीय जनता पार्टी लोकांच्या जीवाशी खेळ खेळत आहे का हा प्रश्न इथे उपस्थित होत आहे.


Full View
Tags:    

Similar News