मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी; मंत्रिमंडळ बैठकीत अध्यादेश येण्याची शक्यता

Update: 2023-10-31 03:33 GMT

Mumbai : आजच्या मंत्रिमंडळ बैठक(Cabinet Meeting) होणार आहे. दरम्यान मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) मंत्रिमंडळ बैठकीत अध्यादेश काढण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. यापार्श्वभूमिवर एक-दोन दिवस विधीमंडळाचं विशेष अधिवेशन घेऊन अध्यादेशाला मंजुरी घेतली जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. आज दुपारी 12 वाजता मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे.

मराठा आरक्षणच्या मागणीसाठी सध्या मराठा समाज आक्रमक झाला आहे. महायुतीच्या सरकारला दोनशेहून अधिक आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे विशेष अधिवेशनात कायदा मंजूर करण्यात अडचण येणार नाही. मराठा आरक्षणाचा कायदा विशेष अधिवेशनात मंजूर झाल्यास मराठा समाज शांत होण्यास मदत होईल. त्यामुळे विशेष अधिवेशनात हा कायदा मंजूर होणार असल्याची शक्यता आहे.

मराठा आंदोलनाला हिंसक वळण

बीड, हिंगोली, जालना जिल्ह्यात अनेक ठिकाणी जाळपोळ, दगडफेक, रस्ता रोको करण्यात आले होतं, अनेक लोकप्रतिनिधी, सरकारच्या मालमत्तेची जाळपोळ करण्यात आली होती. त्याच पार्श्वभूमिवर बीड नंतर धाराशीव मध्ये संचारबंदी लागू केली आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांच्या घरांवर होणाऱ्या हल्लेदेखील करण्यात आले होते. बीडमध्ये अजित पवार गटाचे प्रकाश सोळंखे आणि शरद पवार गटाचे संदिप क्षिरसागर यांची घरे संतप्त जमावाने जाळल्याने राज्यातील लोकप्रतिनिधीच्या घरासमोरील बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

Tags:    

Similar News