श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना मुहूर्तातील 84 सेकंदाचा खास शुभ मुहूर्त

Update: 2024-01-22 03:17 GMT

Ayodhya Ram Mandir : रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना आज आयोद्येत पार पडणार आहे. रामभक्त ज्या क्षणाची वाट पाहत होते तो क्षण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. देशभरासह जगभरात आज राममय वातावरण पाहायला मिळत आहे. आजची सकाळी जय श्री रामाच्या स्मरणाने ठिक ठिकाणी रामभक्त 'जय श्री राम' असे नारे देतं आहेत.आज नवीन मंदिरात माच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे आणि काही सेकंदाचा मुहूर्त प्राणप्रतिष्ठापना करण्यासाठी असणार आहे (Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha)

या सोहळ्यासाठी जगभरातून असंख्य लोक अयोध्येत हा सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी दाखल झाले आहे. देशातील अनेक क्रिकेटेर, अभिनेते, राजकीय पुढारी या सोहळ्यास सहभागी होणार आहेत. दरम्यान दुपारी 12:20 मिनिटानी  (Ram mandir inauguration time)श्री रामाच्या मंदिरातील गर्भगृहात प्राण प्रतिष्ठापणा लगभग सुरु राहणार आहे. राम मंदिरात रामलल्लाच्या अभिषेकासाठी शुभ मुहूर्त 12:29 वाजून 8 सेकंद ते 12:30 मिनिटे 32 सेकंदचा आहे. याचा अर्थ श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी 84 सेकंद अतिशय महत्त्वाचे आहेत. या शुभ मुहूर्तावर राम मंदिरात प्रभू रामचंद्राचा अभिषेक होणार आहे.

Tags:    

Similar News