America Mississippi Tornado : अमेरिकेत चक्रीवादळाचे थैमान, मोठ्या प्रमाणावर जीवितहानी

अमेरिकेतील मिसिसीपीत आलेल्या चक्रीवादळाने भयंकर रुप धारण केले आहे. या चक्रीवादळाने मिसिसीपी शहरात विध्वंस घडवला आहे.

Update: 2023-03-26 05:53 GMT

अमेरिकेतील (America) मिसिसीपी (Mississippi) शहरात टोरंडो चक्रीवादळाने (Hurricane Tornado) थैमान घातले आहे. त्यामुळे दोन डझनपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यापार्श्वभुमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी निवेदन केले आहे.

जो बायडन यांनी म्हटले आहे की, शनिवारी मिसिसीपीच्या अनेक शहरांमध्ये धडकलेल्या भयंकर चक्रीवादळाने 26 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच चक्रीवादळाने प्रभावित झालेल्या भागात आपत्कालिन मदतीचे आश्वासन दिले आहे. तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माहितीनुसार मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे, असं राष्ट्रध्यक्ष बायडन यांनी म्हटले आहे.

तसेच या घटनेतील फोटोंचे वर्णन हृदयद्रावक असं केले आहे. त्यामुळे आम्ही जमेल त्या मार्गाने मदत करू आणि ती मदत कितीही वेळा लागली तरी देऊ, असंही जो बायडन यांनी सांगितले.

मिसिसिपीमध्ये झालेल्या चक्रीवादळानंतर मिसिसिपीचे गव्हर्नर टेट रिव्ह्स (Tate Reeves) यांनी राष्ट्राध्यक्ष बायडन यांच्याशी चर्चा करून विनाशकारी चक्रीवादळाची माहिती दिली. तसेच एजन्सी फॉर फेडरल इमर्जन्सी मॅनेजमेंट (FEMA), कार्पोरेशन, धर्मादाय संस्था आणि फेडरल सरकारने स्थानिकांच्या मदतीसाठी मोठा प्रयत्न केला असल्याचे रीव्ह्स यांनी ट्वीट केले.

शुक्रवारी मिसिसिपीमध्ये ढगांच्या गडगडाटासह वादळी पाऊस पडला. या वादळाने संपूर्ण मिसिसिपीला झोडपून काढले. त्यामुळे अनेक मार्गावरील समुदायांचे मोठे नुकसान झाले होते. या वादळासंदर्भात मिसिसिपीचे आपत्ती व्यवस्थापन प्रवक्ते मॅलरी व्हाईट (Mallory White) यांच्या मतानुसार सध्यातरी सर्वेक्षण पूर्ण झाले नाही. त्यामुळे किती नुकसान झाले आहे त्याचा अंदाज बांधणे अवघड आहे.

Tags:    

Similar News