मुंबईत आता खुलजा सिम सिम... दुकाने उघडणार!

Update: 2020-08-04 02:29 GMT

कधी न थांबणारी मुंबई कोरोनाने थांबली. पूर्ण लॉक... सरकारने कोरोनाला रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनेत सतत धावणारी मुंबई 5 महिन्यांपासून चाचपडत आहे. मात्र, मुंबईतील कोरोनाचा वेग मंदावल्यानं मुंबई अनलॉक मोडवर आणण्याची तयारी सरकार करत आहे. याचाच एक भाग म्हणून सरकार मुंबईतील सर्व दुकानं खुली करणार आहे.

हे ही वाचा...

राज्यात पहिल्यांदाच असं घडतंय, कोरोनाला रोखण्यासाठी मुस्लीम समाजातील दानशूर व्यक्ती करणार खर्च…

सावधान! ‘नेटफ्लिक्स’ ची बनावट वेबसाईट…

पुण्यात कोरोनाचा कहर, ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ४१ हजारांच्यावर

गेल्या मार्च महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊनची घोषणा केली होती. त्यानंतर मुंबईसह पूर्ण देश लॉक झाला होता. त्यानंतर आता पहिल्यांदाच मुंबई तील सर्व दुकानं खुली करण्यात य़ेणार आहेत. मिशन बिगिन अगेन अंतर्गत सरकारने निवडक दुकांनांना परवानगी दिली होती. मात्र, आता सरकार मुंबईत सर्व दुकान खुली करणार आहे.

Similar News