पाकिस्तानचा सगळ्यात मोठा भाग आहे बलुचिस्तान...अख्ख्या पाकिस्तानच्या क्षेत्रफळाच्या ४४ टक्के भाग हा बलुचिस्तानचा हे...मात्र, लोकसंख्येची घनता अत्यंत कमी आहे...इराण, अफगाणिस्तान आणि अरबी समुद्राच्या सीमा बलुचिस्तानला लागून आहेत...कोळसा, गॅस, तांबे आणि सोनं यामुळं हा तसा सधन भाग आहे...चीन आणि पाकिस्तानमध्ये आर्थिक व्यवहारासाठीचा महत्त्वाचा ग्वादर पोर्ट देखील याच भागात होतोय...
बलुचिस्तान इतका सधन भाग असूनही इथली लोकं समाधानी नाहीत...विशेषतः बलूच जातीच्या लोकांचा समूह हा कित्येक दशकांपासून उपेक्षा, भेदभाव आणि सैन्याच्या दबावाचा सामना करतोय. याविरोधात स्वतंत्र बलूचची मागणी करणाऱ्या वेगवेगळ्या संघटनांनी सशस्त्र आंदोलनं सुरु केली आहेत...
बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (BLA) आणि बलुच लिबरेशन फ्रंट (BLF) यासह इतर बलुच संघटनांनी स्वतंत्र देशाची मागणी पाकिस्तानकडे लावून धरलीय...मे २०२५ मध्ये BLA संघटनेनं ‘ऑपरेशन हेरोफ 2.0’ सुरु केलं. या मोहीमेद्वारे एकाच दिवसात ७८ पेक्षा अधिक हल्ले संघटनेनं पाकिस्तानच्या दिशेनं केले. यावेळी बलुच लिबरेशन आर्मीच्या टार्गेटवर पाकिस्तानी सैन्याच्या छावण्या, आयएसआय संघटनेचे गुप्त अड्डे, CPEC शी निगडीत योजना होत्या...या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानी सैनिक, पोलीस मोठ्या प्रमाणावर मारले गेले...या कारवाईनंतर स्वतंत्र बलुचसाठी लढणाऱ्या संघटनानी तर दावाही केलाय की, आता त्यांचं आंदोलन हे पूर्ण स्वातंत्र्यांच्या निर्णायक वळणावर आलंय...
मार्च २०२५ मध्ये बलुच आंदोलकांनी जाफर एक्सप्रेस नावाच्या संपूर्ण रेल्वेचंच अपहरण करत ३८० प्रवाशांना बंधक बनवलं होतं. यावेळी झालेल्या हल्ल्यात ६४ लोकं मारली गेली. या घटनेनंतर पाकिस्तानच्या राजकीय आणि संरक्षण दलामध्ये एकच खळबळ माजली होती...
या घटनेनंतर बलुच नेते अख्तर मेंगल यांनी पाकिस्तानच्या संसदेतील खासदार पदाचा राजीनामा दिला...त्यानंतर मेंगल म्हणाले, “बलुचिस्तान आता पाकिस्तानच्या नियंत्रणात नाहीये. गेल्या कित्येक वर्षांपासून आमच्या आवाजाकडे दुर्लक्ष करण्यात आलं होतं”. मेंगल यांचं हे वक्तव्य पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा समजली जातेय...
१४ मे २०२५ रोजी अनेक बलुच नेते एकाच मंचावर एकत्र आले...या नेत्यांनी स्वतंत्र बलुचिस्तानची रिपब्लिक ऑफ बलुचिस्तान अशी घोषणाही करुन टाकली... या घोषणेला आंतरराष्ट्रीय समुदायानं मान्यता देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली...
प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते माहरंग बलुच यांच्या अटकेनंतर स्वतंत्र बलुचिस्तानसाठीचं आंदोलन अधिक तीव्र झालं...२० मार्च २०२५ पासून सुरु झालेल्या या आंदोलनात हजारो लोकं रस्त्यावर उतरली...पोलिसांनी केलेल्या कारवाईत कित्येक लोकं मरण पावली तर अनेकजण जखमी झाले...
बलुचिस्तानमध्ये हजारो नागरिक कित्येक वर्षांपासून बेपत्ता आहेत...यावर कुठलाही खटला न चालवता पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणांनी त्यांचं अपहरण केल्याचा आरोप आहे...हा मुद्दा मानवाधिकार संघटनांसाठी चिंतेचा विषय झालाय...
स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी आणि भारताच्या भुमिकेकडे जगाचं लक्ष लागलेलं आहे...
बलुच लिबरेशन फ्रंटचे नेते डॉ. अल्लाह नजर बलुच यांनी भारताकडून सहकार्य मागितलेलं आहे...भारतानं ज्याप्रकारे १९७१ मध्ये बांग्लादेशाला सहकार्य केलं होतं, तसंच आता बलुचिस्तानला केलं पाहिजे... भारतानं बलुचिस्तानला शस्त्र पुरवठा करावा, राजकीयदृष्ट्या समर्थन द्यावं, बलुचिस्तानचा मुद्दा संयुक्त राष्ट्र संघटनेतही उठवावा, अशी अपेक्षा स्वतंत्र बलुचिस्तानवादी भारताकडून करत आहेत...
बलुचिस्तानमधील अस्थिरतेमुळं शेजारी चीनही घाबरलेला आहे...कारण पाकिस्तान आणि चीनमधील व्यापाराच्या दृष्टीनं महत्त्वाची असलेली CPEC योजना असो की ग्वादर बंदराचं बांधकाम असो या अस्थिरतेमुळं हे दोन्ही महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रभावित होत आहेत...अलिकडच्या काही वर्षांमध्ये चीन ने गुप्त पद्धतीनं पाकिस्तानी सैन्याला तांत्रिक आणि इतर गोष्टींचं समर्थन द्यायला सुरुवात केली होती...
सध्याचा बलुचिस्तान नियंत्रणाबाहेरचा असल्याचं दिसतंय...कित्येक दशकांपासून उपेक्षित, शोषित आणि पीडित असलेली बलुचिस्तानची लोकं आता राजकीय आणि संरक्षणाच्या दृष्टीनं पाकिस्तानच्या विरोधात निर्णायक संघर्षाच्या दिशेनं पुढे जात आहेत... समजा जर पाकिस्तान सरकार आणि आंतरराष्ट्रीय समुहानं बलुचिस्तानचा मुद्दा गांभिर्यांन घेतला नाही तर हा मुद्दा केवळ पाकिस्तानच नाही तर संपूर्ण दक्षिण आशियासाठी दीर्घकालीन अस्थिरतेचं कारण बनण्याची शक्यता नाकारता येत नाही...