राज्यात पाऊस पुन्हा पाऊस, यंदा थंडीही विक्रम मोडणार

Rains again in the state, cold weather will also break records this year | MaxMaharashtra

Update: 2025-10-17 11:12 GMT

राज्यातील काही भागात पुन्हा पाऊसाचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केलाय. २० ऑक्टोबरपर्यंत विविध भागांत पाऊस होईल. नोव्हेंबर पासून देशातील इतर भागांसह महाराष्ट्रातही कडाक्याची थंडी पडण्याची दाट चिन्हे आहेत. यंदा नियोजित वेळेच्या एक दिवस उशिरा म्हणजे १६ ऑक्टोबरला नैऋत्य मान्सून देशाबाहेर गेला आहॆ. त्याच वेळी, ईशान्य मान्सून दक्षिण भारतात दाखल झाला. पुढील अडीच महिने पूर्व किनाऱ्यावर पावसाचा एक नवीन टप्पा सुरू राहील असा अंदाज व्यक्त केलाय.

यंदा पंधरा वर्षानंतर सर्वात भीषण थंडी पडणार असल्याची शक्यताही हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली

या वर्षी हिवाळा सामान्यपेक्षा आधीच सुरू होऊ शकतो. त्याचा कालावधीही जास्त असेल. म्हणजे गंगेचा मैदानी प्रदेश आणि मध्य भारतात हिवाळा नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत राहू शकतो. हिवाळी महिन्यांत जागतिक हवामान सामान्यपेक्षा जास्त थंड असेल.

हवामानशास्त्रज्ञांचा अंदाज आहे की येत्या हिवाळी हंगामात २०१० नंतरची सर्वात तीव्र थंडी जाणवू शकते. या हिवाळ्याच्या हंगामात सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडू शकते आणि सक्रिय पश्चिमी विक्षोभ वायू वायव्य भारतातील भागात जास्त प्रमाणात प्रभावित करतील.

Tags:    

Similar News