Fact Check : पाकिस्तानी युजर्सकडून स्वतःच्याच सैनिकांचे शव भारतीय सैनिकांचे दाखवत व्हिडिओ शेअर

Update: 2025-05-10 14:01 GMT

पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी छावण्या भारतीय सैन्याकडून ‘ऑपरेशन सिंदूर’ द्वारे नेस्तनाबूत करण्यात आल्या आहेत. त्यानंतर सोशल मीडियावर कुठलीही खातरजमा न करता व्हिडिओ आणि फोटोज् व्हायरल केले जात आहेत. असाच एक व्हिडिओ खोट्या दाव्यासह व्हायरल करण्यात आलाय. या व्हिडिओमध्ये एक सैनिक युद्ध थाबंल्याचे सांकेतिक रुपात सांगतांना पांढरा ध्वज फडकावित आहे, तर दुसरा सैनिक एक पार्थिव घेऊन जातांना दिसतोय. पाकिस्तान समर्थक सोशल मीडिया अकाऊंट्स वरुन दावा करण्यात आलाय की, भारतीय सैनिक पांढरा ध्वज फडकावून पाकिस्तानला सांगतोय की, त्यांच्यावर बॉम्बहल्ले करु नका.

पहलागममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. त्याच्या दोन आठवड्यानंतर भारतीय सैन्यानं पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी ठिकाणं उध्वस्त केली. या ठिकाणांवरुनच भारताविरोधात हल्ल्याचा कट रचला गेला होता. केंद्रीय संरक्षण मंत्रालयानं आधीच स्पष्ट केलंय की, भारतानं पाकिस्तानच्या कुठल्याही सैनिकी सुविधांना लक्ष्य केलेलं नाही. ७ मे २०२५ रोजी रात्री उशिरा जम्मू-काश्मीरच्या पुँछ आणि राजौरी या भागांमध्ये सीमा नियंत्रण रेषेजवळील गावांवर पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणावर गोळीबार केल्याचं वृत्त आहे.

अन्य नेटिझन्सशिवाय X यूज़र डॉ. शमा जुनेजो (@Shamajunejo) ने देखील हा व्हिडिओ शेयर केला आहे. ऑल्ट न्यूजनं हे आर्टिकल लिहेपर्यंत या ट्विटमधील व्हिडिओला ११ लाख व्ह्यूज मिळाले.

 एक अन्य वेरिफ़ाईड अकाउंट, @Aadiiroy2, ने उस वीडियो को उर्दू कैप्शन के साथ ट्वीट किया, “नियंत्रण रेखा पर, भारतीय सेना नरक में भेजे गए सैनिकों के शवों को वापस लाने के लिए सफेद झंडे लहरा रही है.”

आणखी एका व्हेरिफाईड अकाऊंट @Aadiiroy2 या ट्विटर अकाऊंटवरूनही हाच व्हिडिओ उर्दू कॅप्शनसह ट्विट करण्यात आलाय... ”नियंत्रण रेषेवर , भारतीय सैन्य नरकात पाठविण्यात आलेल्या सैनिकांचे पार्थिव परत आणण्यासाठी पांढरा ध्वज फडकावित आहे” असा मजकूर लिहिण्यात आलाय.


कित्येक Xयुजर्सने याच दाव्यासोबत व्हिडिओ शेअर केलाय.

Delete Edit

फॅक्ट चेक

या व्हिडिओ संदर्भात ऑल्ट न्यूजनं पडताळणी केली. त्यात व्हायरल होणारा व्हिडिओ हा फेसबूकवर सप्टेंबर २०१९ मध्ये अपलोड करण्यात आल्याचं आढळलं. १४ सप्टेंबर २०१९ मध्ये हिंदुस्तान टाइम्स च्या व्हिडिओ बातमीनुसार व्हिडिओमध्ये पांढरा ध्वज दाखविल्यानंतर पाकिस्तानचे रेंजर्स नियंत्रण रेषेवर आपल्याच सैनिकांचे शव काढतांना दिसत आहेत. ११ सप्टेंबर २०१९ रोजी भारतीय सैन्यानं प्रत्युत्तरात केलेल्या गोळीबारामध्ये दोन पाकिस्तानी सैनिक मारले गेले होते. पाकिस्तानच्या सैनिकांनी पांढरा ध्वज दाखविल्यानंतर त्यांना शव मिळाले होते.

Full View

हिंदुस्तान टाइम्सच्या व्हिडिओमध्ये ANI या वृत्तसंस्थेचा वॉटरमार्क होता. ऑल्ट न्यूजनं १४ सप्टेंबर २०१९ रोजी ANI चं ट्विट शोधून काढलं, त्या ट्विटमध्ये हिंदुस्तान टाइम्सचा रिपोर्ट खरा असल्याचं स्पष्ट झाला.


द हिंदू या दैनिकानंही १५ सप्टेंबर २०१९ रोजी याच अनुषंगानं एक व्हिडिओ बातमी अपलोड केली. त्यानुसार भारतीय सैन्यानं एक व्हिडिओ प्रसारित केला होता. १० सप्टेंबर २०१९ रोजी भारतीय सैनिकांच्या हल्ल्यात मारले गेलेल्या पाकिस्तानी सैनिकांच्या मृतदेहापैकी एक त्यांच्याच पंजाब रेजिमेंटचे गुलाम रसूल होते. रसूल हे एक पंजाबी मुस्लिम होते, जे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातल्या बहावलनगरचे रहिवाशी होते.

सुरुवातीला पाकिस्तानी सैनिकांनी युद्धविराम उल्लंघनाच्या आडून सैनिकांचे मृतदेह मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, असं करतांना पाकिस्तानचा आणखी एक सैनिक मारला गेला. दोन दिवस सतत प्रयत्न करुनही पाकिस्तानी सैन्य स्वतःचे सैनिकांचे शव मिळवू शकले नव्हते. शेवटी, १३ सप्टेंबर रोजी पाकिस्तानच्या पंजाब रेजिमेंटच्या सैनिकांनी पांढरा ध्वज फडकावून सैनिकांचे मृतदेह हस्तगत करण्याचे प्रयत्न केले. पाढंरा ध्वज फडकाविण्याचा अर्थ शांतता आणि संघर्षाला विराम देण्यासाठीचा संकेत समजला जातो. अगदी त्याच वेळी इंडियन एक्सप्रेसच्या एका मालिकेतूनही या घटनेची पूष्टी होते.

प्रेस ब्यूरो ऑफ इंडियाने भारतीय सैनिक पांढरा ध्वज फडकावित असल्याच्या व्हिडिओ संदर्भात व्हायरल दावा फेटाळत फॅक्ट चेक प्रसारित केलं होतं.

Delete Edit

एकूणच, सप्टेंबर २०१९ चा एका व्हिडिओ ज्यामध्ये पाकिस्तानचे सैनिक आपल्या सैनिकांचे शव हस्तगत करण्यासाठी संघर्ष विराम म्हणून पांढरा ध्वज फडकावित असल्याचं स्पष्ट झालंय. सध्या भारत-पाकिस्तानमध्ये सुरु असलेल्या संघर्षामध्ये पुन्हा हा व्हिडिओ व्हायरल होतोय. पाकिस्तान समर्थकांच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवरुनही हा जुना व्हिडिओ शेअर करत भारतीय सैन्यानं संघर्ष विरामचं आव्हान केल्याचा खोटा दावा केला जातोय.

https://www.altnews.in/hindi/indian-army-waving-white-flag-no-viral-clip-is-from-2019-shows-pak-army-retrieving-soldiers-body/

Tags:    

Similar News