'इतिहास साक्ष देईल की महाराष्ट्रात OBCचे आरक्षण वाचवणारे एकमेव नेते होते ते बाळासाहेब आंबेडकर'

Update: 2025-11-18 03:04 GMT

मागच्या दोन-तीन वर्षांत Maratha Reservation मराठा आरक्षण आणि OBC ओबीसी कोट्यातून मराठा आरक्षण या मुद्द्यावर मोठा वाद निर्माण झाला. जेव्हा इतिहासात मराठा आरक्षणाची नोंद केली जाईल, तेव्हा ती पाच टप्प्यांत लिहिली जाणार आहे.

1. भाजपने ओबीसींचा कोटा कमकुवत करून एक फालतू, तकलादू जीआर काढला आणि ओबीसी कोट्यात मराठ्यांना आरक्षण देण्याचा प्रयत्न केला.

2. कुणबी प्रमाणपत्र हे लग्नपत्रिका, एबी फॉर्म वाटल्या सारखे श्रीमंत, प्रस्थापित मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणे हे भाजप सरकारने सुरू केले.

3. ओबीसींच्या जागा घेऊन, त्यांच्या जागी श्रीमंत मराठ्यांना भाजप उमेदवार उभे करणे.

4. श्रीमंत मराठ्यांना उभे करून ओबीसींचे आरक्षणच संपवण्याची भूमिका घेणारे भाजप.

5. शाहू–फुले–आंबेडकरवादींच्या डोक्यावर श्रीमंत मराठ्यांचे प्रस्थापित लादणारे भाजप.

या पाच टप्प्यांकडे पाहिले, तर इतिहासात दुसरी बाजूही नोंदवली जाईल ती म्हणजे, महाराष्ट्रात बाळसाहेब आंबेडकर हे एकमेव नेते स्पष्ट आणि ठाम भूमिका घेऊन म्हणत राहिले की, "ओबीसी आरक्षणाचे ताट आणि मराठा आरक्षणचे ताट वेगळं राहिलं पाहिजे" रयतेच्या मराठ्यांना आरक्षण दिले पाहिजे; पण निजामी, श्रीमंत, प्रस्थापित मराठ्यांना आरक्षण देऊ नये. ही भूमिका घेऊन सातत्याने लढणारे एकमेव नेते म्हणजे बाळासाहेब आंबेडकर. जेव्हा इतिहासात ओबीसी व मराठा आरक्षणाच्या संघर्षाची नोंद केली जाईल, तेव्हा इतिहास साक्ष देईल की महाराष्ट्रात ओबीसींचे आरक्षण वाचवणारे एकमेव नेते होते ते बाळासाहेब आंबेडकर. हिंगोलीच्या कळमनुरी शहरात वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी असं जाहीर सभेत म्हटलं आहे. तसेच एक्सवर यासंदर्भातला व्हिडिओ शेअर केला आहे.

https://x.com/sujat_ambedkar/status/1990085344155574659?s=48&t=2Xznuip1KV1MMpo5k2O5d

Similar News