Operation Keller : भारतीय सैन्याचं ऑपरेशन किल्लेर, ३ दहशतवाद्यांचा खात्मा
Operation Keller : भारत-पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी करार झाल्यानंतरही दोन्ही बाजूंनी तणाव मात्र सुरुच आहे... भारतीय सैन्यानं जम्मू-काश्मीरच्या किल्लेर इथं केलेल्या कारवाईमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा केलाय. भारतानं या मोहीमेला ‘ऑपरेशन किल्लेर’ असं नाव दिलंय.
जम्मू-काश्मीरच्या शोपिएन जिल्ह्यात मंगळवारी भारतीय सैनिक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली...काही दहशतवादी हे दक्षिण काश्मीर जिल्ह्याच्या शुक्रू किल्लेर या परिसरात असल्याची माहिती भारतीय सैनिकांना मिळाली...भारतीय सैनिकांनी या भागात सर्च ऑपरेशनला सुरुवात केली. काही वेळानंतर सर्च ऑपरेशनचं रुपांतर चकमकीत झालं...दहशतवाद्यांनी भारतीय सैन्यावर गोळीबार केला...त्याला प्रत्युत्तर देतांना भारतीय सैनिकांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला...भारतीय सैन्यानं ‘ऑपरेशन किल्लेर’ची माहिती सोशल मीडियावर दिली.