‘ऑपरेशन सिंदूर’ १०० दहशतवाद्यांना कंठस्नान

Update: 2025-05-11 15:44 GMT

नवी दिल्ली – पाकिस्तानविरोधात भारतीय सैन्याच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ या मोहीमेची माहिती देण्यासाठी आज तीनही दलांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यामध्ये १०० पेक्षा अधिक दहशतवादी मारल्याचा मोठा दावा करण्यात आला आहे.

पहलगाम इथं दहशतवाद्यांनी २६ पर्यटकांना मारल्यानंतर भारतीय सैन्यानं ‘ऑपरेशन सिंदूर’ च्या माध्यमातून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांची ९ ठिकाणं उध्वस्त केली. यामध्ये १०० पेक्षा अधिक दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्याचं तीनही दलांच्या डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी यावेळी सांगितलं. ठार मारण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये युसूफ अजहर, अब्दुल मलिक रौफ आणि मुदासिर अहमद या कुविख्यात दहशतवाद्यांचाही समावेश आहे. आयसी८१४ चे अपहरण आणि पुलवामा स्फोटात या तिघांचाही समावेश होता.

एअर मार्शल ए.के.भारती म्हणाले, ८ आणि ९ मे रोजी रात्रीच्या सुमारास पाकिस्तानकडून सीमाभागातील ठिकाणांवर पाकिस्तानकडून ड्रोन आणि मानवरहित हवाई वाहनांद्वारे मोठ्या हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला होता. भारतीय सैन्यानं जोरदार प्रत्युत्तर देत पाकिस्तानचे मनसुबे उधळून लावले.

Tags:    

Similar News