संजय राऊत यांच्या आक्रोश मोर्चाला मनसेने प्रति मोर्चाने उत्तर?

Update: 2021-11-13 05:06 GMT

देशभरात वाढलेल्या महागाईच्या विरोधात शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली आज औरंगाबादमध्ये आक्रोश मोर्चा काढत आहे. मात्र त्यापूर्वी मनसेने या मोर्चाला होर्डिंग लावून उत्तर दिलं आहे.तर हा 'आक्रोश आत्ताच का?' असा प्रश्न सुद्धा उपस्थित केला आहे. तसेच शिवसेनेच्या मोर्चाला प्रति मोर्चाने उत्तर देणार असल्याचं मनसे जिल्हाध्यक्ष सुहास दशरथे यांनी म्हटले आहे.

औरंगाबादच्या क्रांती चौकातून आज संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली महागाईविरोधात शिवसेनेकडून आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.यावेळी मराठवाड्यातील शिवसेनेचे अनेक नेते उपस्थित राहणार आहे. मात्र या मोर्चाला मनसेकडून प्रती मोर्चा असे उत्तर देण्यात येणार आहे. त्यामुळे मनसे आणि शिवसेना आमने-सामने येण्याची शक्यता आहे. तर याच पार्श्वभूमीवर मोर्चा स्थळी औरंगाबाद शहर पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला आहे.

Tags:    

Similar News