आपत्कालीन मदत करतांना अग्निशनमच्या अधिकाऱ्याचा मृत्यू

Update: 2023-07-20 10:33 GMT

रायगड – इर्शाळगडावरील ठाकूरवाडी इथं काल रात्री दरड कोसळळल्याची दुर्दैवी घटना घडली. यावेळी नवी मुंबई महापालिकेतील सहाय्यक केंद्र अधिकारी शिवराम ढुमणे हे आपत्कालीन मदतीसाठी घटनास्थली गेले होते. मात्र, मदतकार्य करत असतांनाच त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

काल रात्री मोरबे डॅम जवळ असलेल्या इर्शाळ गडाचा भाग खचल्याने त्यावरील इर्शाळ वाडी ही वस्ती जमीनदोस्त झाली. रात्रीच घटनास्थळी मदतकार्यासाठी पोहोचलेले ढुमणे हे रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास मदतकार्य करत असतांना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय.  

Tags:    

Similar News