देशात कोरोनाचे सर्वाधिक अ‍ॅक्टीव्ह रुग्ण असलेल्या १० पैकी ९ जिल्हे महाराष्ट्रात

Update: 2021-03-24 12:20 GMT

राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असताना आता आणखी एक चिंताजनक माहिती समोर आली आहे. कोरोनाची बाधा झालेल्या एक्टिव्ह रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेल्या १० जिल्ह्यांपैकी महाराष्ट्रातील ९ जिल्हे तर कर्नाटकमधील एका जिल्ह्याचा समावेश आहे.

यामध्ये मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद नांदेड, जळगाव आणि अकोला या जिल्ह्यांचा समावेश आहे. तर बंगळुरू शहरी भागाचा समावेश आहे.अशी माहिती केंद्रीय आरोग्य सचिन राजेश भूषण यांनी दिली आहे. त्याचबरोबर देशातील दोन राज्यांमधील सर्वाधिक चिंताजनक आहे, असेही भूषण यांनी म्हटले आहे. ही दोन राज्ये म्हणजे महाराष्ट्र आणि पंजाब असल्याची माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्रात गेल्या २४ तासात २८ हजार रुग्ण आढळले आहेत, तर पंजाबमध्ये लोकसंखेच्या तुलनेत रुग्ण वाढत असल्याचेही भूषण यांनी सांगितले आहे. याचबरोबर गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये दिवसाला अनुक्रमे १७०० आणि १५०० रुग्ण आढळत आहेत, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान देशातील १८ राज्यांमध्ये कोरोनाच्या विविध विषाणूंचे ७७१ रुग्ण आढळले आहेत. यामध्ये ७३६ रुग्ण हे ब्रिटनमधील विषाणू, ३४ रुग्णांमध्ये दक्षिण आफ्रिकेतील कोरोना विषाणू तर आणि एका रुग्णाला ब्राझीलमधील कोरोना विषाणूची लागण झाली आहे, अशी माहिती राष्ट्रीय साथरोग नियंत्रण केंद्राचे संचालक डॉ. आर.के. सिंग यांनी दिली आहे.

Tags:    

Similar News