शिंदेंच्या शिवसेनेचे 8 उमेदवार घोषित पाहा कोणाला मिळाली उमेदवारी

Update: 2024-03-28 14:43 GMT

शिंदेंच्या शिवसेनेचे 8 उमेदवार घोषित पाहा कोणाला मिळाली उमेदवारी

हिंगोलीतून पुन्हा एकदा हेमंत पाटील यांनाच संधी दिली असून हातकणंगल्यातून धैर्यशील माने यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

राज्यातील लोकसभेच्या 48 जागांसाठी भाजपने सर्वाधिक 24 उमेदवार जाहीर केले आहेत. त्यानंतर काँग्रेसने 12, शिवसेना ठाकरे गटाने 17 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 2 उमेदवार जाहीर केले आहेत. त्याशिवाय प्रकाश आंबडेकर यांनी नऊ उमेदवारांची यादी जाहीर केली असून आता काही तासांपूर्वीच शिंदेंच्या शिवसेनेने 8 जागी त्यांची उमेदवारी जाहीर केली आहे.

कोल्हापुरात काँग्रेसचे उमेदवार शाहू छत्रपती यांना शिवसेना (शिंदे गट) पक्षाकडून संजय मंडलीक टक्कर देतील. एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे गेली २ टर्म कल्याण मधून खासदार आहेत. भाजप या ठिकणी गेल्या काही दिवसांपासून जोर लावत आहे. या यादीमध्ये शिंदेंनी विद्यमान खासदारांपैकी एकाचंच तिकीट कापलं आहे. रामटेकमधून सध्याचे खसादार कृपाल तुमाने यांचं तिकीट कापण्यात आलं आहे.


उमेदवारांचे मतदारसंघ आणि त्यांचे नावं

मुंबई दक्षिण मध्य - राहुल शेवाळे

कोल्हापूर - संजय मंडलिक

शिर्डी - सदाशिव लोखंडे

बुलढाणा - प्रतापराव जाधव

हिंगोली - हेमंत पाटील

मावळ - श्रीरंग बारणे

रामटेक - राजू पारवे

हातकणंगले - धैर्यशील माने

Tags:    

Similar News