वडाळा येथे जून्या विहिरीत आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह

Update: 2021-07-26 08:52 GMT

नाशिक : नाशिकच्या वडाळा गावातील अण्णाभाऊ साठे नगर लगत असलेल्या एका जून्या विहिरीत 35 ते 40 वयाच्या अनोळखी पुरुषाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत, सिडको अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. संबधित व्यक्तीचा गळा आवळून खून केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक निलेश माईनकर यांनी दिली आहे.

शनिवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास हिरामण साळवे हे आपल्या शेतात गेले असता दुर्गंधी येत असल्याने त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता त्यांना विहिरीत एक मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. त्यांनी त्वरीत घटनेची माहिती इंदिरानगर पोलिसांना दिली. दरम्यान पोलिसांनी मृतदेह बाहेर काढत तो शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी पंचनामा करत अज्ञात इसमाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

हत्या झालेल्या व्यक्तीच्या डाव्या हातावर मारुती चित्र आणि शंकराची पिंड गोंदलेले आहे . या व्यक्तीबाबत कोणाला काही माहिती असल्यास इंदिरानगर पोलीस स्टेशनला माहिती द्यावी असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर यांनी केले आहे.

Tags:    

Similar News