आयुर्वेदिक औषधाच्या नावाखाली १ हजार कोटींच्या ड्रग्जची तस्करी

Update: 2020-08-10 08:30 GMT

जेएनपीटी बंदरात तब्बल १ हजार कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. सीमा शुल्क विभाग व महसुल गुप्त वार्ता संचलनालयाने (डीआरआय) यांनी संयुक्तरित्या केलेल्या कारवाई जेएनपीटी बंदरात तब्बल 191 किलो हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. रविवारी ही कारवाई करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थाची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात एक हजार कोटी रुपये इतकी आहे.

याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आले आहे. अगाणिस्तानातून हे ड्रग्स आणण्यात आले होते. जेएनपीटी बंदरात परदेशातून ड्रग्सचा मोठा साठा येणार असल्याची गुप्त माहिती डीआरआयला मिळाली होती. त्यानुसार डीआरआय व सीमा शुल्क विभागाच्या संयुक्त पथकाने बंदरात शोध मोहिम राबवून रविवारी संशयित कंटेनर शोधून काढला. आयुर्वेदिक मुलेठीच्या नावाखाली त्यातून हेरॉईन लपवून आणण्यात आले होते. त्याशिवाय काही ड्रग्सचा साठा पाईपमध्येही लवपण्यात आला होता. मुलेठीला भारतात मोठी मागणी आहे.

हे ही वाचा...

अंधारातले दिवे…. !!

“जंग फिर भी बाकी हैं…”

“काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष हवा”

त्यामुळे आयुर्वेदिक औषधाच्या नावाने हा ड्रग्सचा साठा भारतात पाठवण्यात आला होता. त्यानुसार शोध मोहीम राबवून हा साठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी कंटेनरशी संबंधीत दोन व्यक्तींना अटक करण्यात आले आहे. या मागे मोठे रॅकेट असून हा सर्व साठा मुंबई व गोव्यामध्ये जाणार असल्याचा संशय आहे. आंतराष्ट्रीय बाजारात हेरॉईनची किंमत पाच कोटी रुपये किलो आहे. लॉकडाऊनच्या काळात देशात आतापर्यंत पकडण्यात आलेला हा सर्वात मोठा अंमली पदार्थांचा साठा आहे. याप्रकरणाचे तार परदेशापर्यंत जात आहेत. रविवारी रात्री उशीरापर्यंत ही कारवाई सुरू होती.

Similar News