Home > News Update > “काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष हवा”

“काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष हवा”

“काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष हवा”
X

2019 मधल्या पराभवानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर पक्षाची जबाबदारी पुन्हा एकदा सोनिया गांधी यांच्यावर हंगामी अध्यक्ष म्हणून टाकण्यात आली. आज या निर्णयाला एक वर्ष होत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी काँग्रेसला एक पूर्णवेळ अध्यक्ष असण्याची गरज व्यक्त केली आहे. शशी थरुर यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये हे वक्तव्य केले आहे.

“राहुल गांधी यांनी पुन्हा अध्यक्ष व्हावे. त्यांच्याकडे काँग्रेसचे अध्यक्ष होण्यासाठी धैर्य, क्षमता आणि पात्रता आहे. पण जर ते तयार नसतील तर पक्षाने नवीन पूर्णवेळ अध्यक्ष शोधण्याची प्रक्रिया सुरू केली पाहिजे.” असे वक्तव्य शशी थरुर यांनी केले आहे.

हे ही वाचा...

राज्यात एका दिवसात १३ हजार ३४८ रुग्ण कोरोनामुक्त

प्रकाश आंबेडकर करणार लॉकडाऊन च्या विरोधात ‘डफली बजाव’ आंदोलन

Western Maharashtra Flood: 2019 ची पुनरावृत्ती होईल?

Fact Check: महाराष्ट्रात भाजपचे 12 हून अधिक आमदार फुटणार?

“सोनिया गांधी यांनी हंगामी अध्यक्ष केल्यानंतर आपण त्याचे स्वागत केले होते. पण त्यांनी पुढेही ही जबाबदारी पार पाडावी अशी अपेक्षा कऱणे योग्य नाही. तसंच काँग्रेस पक्ष दीशाहिन आणि लक्ष्यहिन असल्याची भावना मीडिया लोकांमध्ये वाढवत आहे, यासाठी आता पूर्णवेळ अध्यक्ष असण्याची गरज थरुर यांनी व्यक्त केली आहे. एवढेच नाहीतर अध्यक्षपदाची निवड निवडणूक प्रक्रिया पार पाडून घेतली तर अध्यक्षांची विश्वासार्हता वाढेल आणि संघटनात्मक स्तरावर पक्षाला नवी उभारी मिळू शकेल” असेही थरुर यांनी म्हटले आहे.

राहुल गांधी यांची निवड डिसेंबर 2022 पर्यंत झाली होती. त्यांनी आताही आपला राजीनामा मागे घेतला तर ते अध्यक्ष म्हणून काम पाहू शकतील असंही थरुर यांनी म्हटलेले आहे.

Updated : 10 Aug 2020 2:05 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top