#SharadPawar भाजपच्या टीकेवर शरद पवार यांचा पलटवार पुन्हा 'ती' कविता वाचत म्हणाले…

Update: 2022-05-12 14:51 GMT

"ब्रह्मदेव आमचा निर्माता की आम्हीच ब्रह्मदेवाचे पिता…", कवी जवाहर राठोड यांच्या कवितेतील काही अंश घेऊन भाजपनं ( BJP)केलेल्या टीकेचा पलटवार आता शरद पवारांनी (sharad pawar)पुन्हा तीच कविता वाचन करून केला आहे.

भाजपच्या आयटी सेलने बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एक व्हिडीओ ट्वीट करत शरद पवारांवर सडकून टीका केली होती.

शरद पवार यांनी हिंदू देवी-देवतांचे बाप काढले. पवार नेहमी हिंदू धर्माचा द्वेष करतात.पवारांनी हिंदू धर्माची बदनामी केली नसती, जातिवाद केला नसता, देवी देवतांचा अपमान केलाच नसता तर एवढे मोठे झालेच नसते. पवार साहेब या वयात आपल्याला शोभेल असं वक्तव्य करावे, अशी टीका भाजपने केली होती.

यावरून भाजपचा आयटी सेल आणि राष्ट्रवादीचा आयटी सेल यांच्यामध्ये तुंबळ युद्ध रंगलं होतं. या व्हिडीओत शरद पवार यांनी कवी जवाहर राठोड यांची एक कविता म्हटली होती. भाजपाच्या टीकेनंतर शरद पवार यांनी पुण्यात पुन्हा ती कविता वाचली आणि भाजपाला प्रत्युत्तर दिलंय. "'आम्ही पाथरवट…' या कवितेत कष्टकऱ्यांच्या वेदना आहेत. त्याचा कोणी गैरप्रचार करत असेल तर त्यांनी आवश्य करावा," असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं.

शरद पवार म्हणाले, "मी सांगितलेलं काव्य जवाहर राठोड यांचं आहे. जवाहर राठोड एवढंच म्हणतात की माझ्या छन्नीने तुमच्या पाषाणातून आम्ही सगळे देव घडवले. तुम्ही आम्हालाच तिथे अडवत आहात. या कष्टकऱ्याच्या वेदना आहेत."

"कवितेचा कोणी गैरप्रचार करत असेल, तर आवश्य करावा" शब्दात शरद पवारांनी भाजपला प्रतिटोला दिला आहे. पवारांचे साताऱ्यातील भाषण सुविचार अर्थ कडून वायरल केलेला विडिओ चा राष्ट्रवादीकडून धिक्कार करण्यात आला आहे.

Tags:    

Similar News