वंचितांच्या प्रश्नावरुन खरगे - नड्डा आमने-सामने

Update: 2025-12-11 02:41 GMT

संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी होतच असते. मात्र, ९ डिसेंबरला राज्यसभेत वंदे मातरम् वरुन चर्चा सुरु होती. या चर्चेमध्ये राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खरगे बोलत होते. त्यावेळी राज्यसभेचे सभापती सी.पी. राधाकृष्णन्, भाजपचे गटनेते जे.पी. नड्डा आणि खरगेंमध्ये शाब्दिक खडाजंगी झाली.

मल्लिकार्जून खरगे यांनी तब्बल ५३ मिनिटं वंदे मातरम् वर राज्यसभेत भाषण केलं. साधारणतः ४० मिनिटांनी खरगेंनी देशातील वंचित घटकांवर आजही अन्याय होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला...त्यावर सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरुन आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली...त्यावर सभापती सी.पी. राधाकृष्णन् यांनी थेट खरगेंनाच प्रश्न विचारला की,“ तुमचा प्रॉब्लेम काय आहे ? ” यावर खरगे म्हणाले, “ माझा प्रॉब्लेम हा आहे की, आजही दलितांना मंदिरात प्रवेश नाही, लग्नात घोड्यावर बसू दिलं जात नाही, गावातल्या विहिरीतून पाणी पिऊ दिलं जात नाही, बेदम मारहाण करुन त्यांना अपमानित केलं जातं...”

खरगेंनी एकामागून एक असे मुद्दे उपस्थित केले. त्यावर जे.पी. नड्डांनी हस्तक्षेप करत, “ देशातील सर्व दलित हे आमचे बांधव आहेत, मोदींच्या कार्यकाळात दलितांचा जेवढा विकास झाला तेवढा यापूर्वी कधीच झाला नसल्याचं म्हटलं”. दरम्यान हा सगळा गदारोळ सुरु असतांना सभापती सी.पी. राधाकृष्णन् यांनी Nothing Will Go on Record म्हणत खरगेंनी उपस्थित केलेले मुद्दे पटलाच्या रेकॉर्डवर जाणार नसल्याचं स्पष्ट केलं.

पाहा नेमकं काय म्हणाले मल्लिकार्जुन खरगे


Similar News