प्रशांत किशोर कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार?

सोनिया गांधी, राहुल गांधी यांची दिल्लीत घेतली भेट…

Update: 2022-04-16 11:01 GMT

दिल्ली: निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी आज (शनिवार) काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेतली. या भेटीनंतर प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना पुन्हा उधान आलं आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या प्रचाराची धुरा प्रशांत किशोर सांभाळणार असल्याची सध्या चर्चा सुरु आहे.

गेल्या वर्षीही प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये जाणार आणि त्यांना महत्त्वाचे पद दिलं जाणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, तसं होऊ शकले नाही. त्यानंतर प्रशांत किशोर यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासोबत अनेक बैठका घेतल्या. मात्र, त्यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश झाला नाही. त्यानंतर प्रशांत किशोर यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर टीका केली होती.

प्रशांत किशोर यांच्या निकटवर्तीयांचे मते काँग्रेस नेते प्रशांत किशोर यांच्या सोबत गुजरात विधानसभा निवडणुकीबरोबरच 2024 च्या लोकसभा निवडणूकीच्या रणनितीसंदर्भात चर्चा करत आहे.

प्रशांत किशोर आणि प्रशांत किशोर यांचे एकेकाळचे सहकारी सुनील कानुगोलू यांनी काही दिवसांपूर्वी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची भेट घेतली होती. या भेटीत प्रशांत किशोर यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा केली होती.

दरम्यान पाच राज्याच्या विधानसभा निवडणूकीच्या पराभवानंतर कॉंग्रेसला 2023 ला होणाऱ्या विधानसभा निवडणूकीत विजय मिळवणं गरजेचं आहे. अन्यथा 2024 च्या लोकसभा निवडणूकीत कॉंग्रेसला इतर विरोधी गटातील मित्र पक्षाची साथ मिळणंही मुश्कील होईल

Tags:    

Similar News