Ajit Pawar Plane Crash : विमान अपघाताआधी बारामतीच्या धावपट्टीवर काय घडलं ?

Update: 2026-01-28 10:53 GMT

Ajit Pawar Plane Crash उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रवास करत असलेल्या विमानाचा अपघात नेमका कसा झाला याविषयीची माहिती हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाच्या (Air Traffic Control - ATC ) वतीनं देण्यात आलीय. बारामती हे अनियंत्रित विमानतळ आहे. त्यामुळं बारामतीच्या ज्या धावपट्टीवर हा विमान अपघात झाला, त्याविषयी बारामती इथल्या उड्डाण प्रशिक्षण संस्थेमधील पायलट/प्रशिक्षक हे हवाई वाहतुकीची माहिती देत असतात. याच हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी अपघाताचा घटनाक्रम सांगितलाय.

अजित पवार प्रवास करत असलेल्या विमानाचा बारामतीच्या उड्डाण प्रशिक्षण केंद्रासोबत पहिला संपर्क झाला तो सकाळी ८ वाजून १८ मिनिटांनी. त्यानंतर ३० नॉटिकल माईल्स अंतरावरुन दुसरा कॉल होता. त्यावेळी अजित पवारांचं विमान चालविणाऱ्या पायटलला बारामतीच्या उड्डाण प्रशिक्षण केंद्राकडून लँडिंग संदर्भात सुचना देण्यात आली होती. त्यामध्ये पायलटनं स्वतःच्या विवेकबुद्धीनुसार दृश्यमान, हवामानाची परिस्थिती पाहून विमान लँडिंग करण्याची सूचना दिली होती.

यावेळी अजित पवारांच्या विमानातील क्रू मेंबर्स ने बारामतीच्या उड्डाण प्रशिक्षण केंद्रांशी संपर्क करुन लँडिंगच्या ठिकाणची दृश्यमानता, वारे याबाबत विचारणा केली असता, वारे शांत असून दृश्यमानता ही सुमारे ३००० मीटर असल्याचं सांगण्यात आलं.

त्यानंतर पायलटने रनवे ११ च्या शेवटच्या मार्गाबद्दल माहिती दिली, त्यावेळी त्यांना धावपट्टी दिसत नव्हती. त्यामुळं पहिल्या मार्गावरच विमानानं फिरायला सुरुवात झाली. त्यानंतर बारामतीच्या उड्डाण प्रशिक्षण केंद्रावरुन पायलटला विमानाच्या स्थितीबाबत विचारणा करण्यात आली. त्यावेळी हे विमान ११ व्या धावपट्टीवर असल्याचं विमानातील कर्मचाऱ्यांनी सांगितलं. त्यावर धावपट्टी दिसतेय का ? त्याबाबत कळवा, असं बारामतीच्या उड्डाण प्रशिक्षण केंद्रावरुन सांगण्यात आलं. त्यावर विमानातील क्रू मेंबर्सकडून उत्तर देण्यात आलं की, सध्या धावपट्टी दिसत नाही. धावपट्टी दिसताच फोन करु” त्यानंतर काही सेकंदांनी विमानातील क्रू मेंबर्सनी सांगितलं की, त्यांना धावपट्टी दिसत आहे.

त्यानंतर विमानाला ८ वाजून ४३ मिनिटांनी धावपट्टी क्रमांक ११ वर उतरण्याची (Landing) परवानगी देण्यात आली. मात्र, विमानातील क्रू मेंबर्सनी लँडिंग क्लिअरन्सची रीडबॅक दिली नाही, अशी माहिती बारामतीच्या उड्डाण प्रशिक्षण केंद्रानं दिलीय.

८ वाजून ४४ मिनिटांनी हवाई नियंत्रण कक्षाला (ATC) आगीच्या ज्वाला दिसल्या. त्यानंतर अपघातस्थळी आपत्कालीन मदत पोहोचली. त्यावेळी अपघातग्रस्त विमानाचे अवशेष हे रन वे क्रमांक ११ च्या डाव्या बाजूला पसरलेले होते.

एअरक्राफ्ट एक्सिडेंट इन्वेस्टिगेशन ब्युरो (AAIB) ने या अपघाताची चौकशी सुरु केलीय. एएआयबीचे महासंचालक हे तपासासाठी अपघातस्थळी रवाना झाले आहेत.

Tags:    

Similar News