अजित पवारांच्या पार्थिवावर उद्या सकाळी ११ वाजता होणार अत्यंसंस्कार

Update: 2026-01-28 10:44 GMT

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शासकीय सुट्टी जाहीर केली असून ३ दिवसांचा दुखवटा जाहीर आहे. बारामतीत कार्यकर्त्यांसोबत राजकीय नेत्यांची गर्दी पाहायला मिळत आहे. आज संध्याकाळी ५ वाजल्या पासून अजितदादांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. उद्या सकाळी म्हणजेच २९ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९ वाजता अंत्ययात्रा निघेल. अंत्यंसंस्कार ११ वाजता बारामतीमधील विद्यानगरी चौकातील विद्या प्रतिष्ठान मैदानात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा देखील यावेळी उपस्थित राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना फोन केला असून अजित पवार यांच्या दु:खद निधनाबद्दल संवाद साधत शोकसंवेदना व्यक्त केल्या. अजित दादांच्या अंतिम दर्शनासाठी बारामतीत जनसमुदाय उसळल्याचं चित्र पाहायला मिळतंय. 

Similar News