"वंदे मातरम" या भारतीय राष्ट्रगानाच्या स्वीकारासाठी 1937 मध्ये काँग्रेस वर्किंग कमिटीने कार्यकारिणीखेरीज आणखी काही तज्ज्ञांना बोलवून विस्तारित समिती बनवली होती. या समितीने वंदे मातरम् मधील पहिल्या दोन कडव्यांचा राष्ट्रगान म्हणून समावेश केला!
हे सदस्य कोण होते ??
१.महात्मा गांधी
२.जवाहरलाल नेहरू
३.नेताजी सुभाषचंद्र बोस
४.डॉक्टर राजेंद्र प्रसाद
५. सरदार वल्लभभाई पटेल
६. मौलाना आझाद
७. डॉक्टर सरोजिनी नायडू
८.आचार्य नरेंद्र देव आणि
९.महाकवी रवींद्रनाथ टागोर, विशेष सल्लागार म्हणून त्यांना पाचारण करण्यात आले होते.
या समितीतील सर्व सदस्यांची प्रदीर्घ चर्चा व विश्लेषण केल्यानंतर विशेषतः महाकवी टागोरांच्या सूचनेनुसार वंदे मातरम् मधील प्रथम दोन कडवी ही राष्ट्रगान म्हणून निश्चित करण्यात आली...!! त्याचे महत्त्वाचे कारण असे होते की बंकिमचंद्र यांनी ही दोन कडवीच मुळात (१८७६) लिहिलेली होती. नंतरची सर्व कडवी ही बंकिमचंद्रांनी नव्याने रचली आणि त्यांच्या 'आनंदमठ' कादंबरीमध्ये प्रथम प्रसिद्ध केली. विशेषत: बंगालच्या फाळणीनंतर 1905 मध्ये या फाळणीविरुद्ध "वंदे मातरम्" ही घोषणा प्रथम दिली गेली होती.
काँग्रेसचेच नेते असलेल्या भिकाजी कामा यांनी 1907 मध्ये वंदे मातरम् या घोषणेचा वापर करून पहिला राष्ट्रीय ध्वज बनवलेला होता.
त्यानंतर स्वातंत्र्यासाठी लढणारे रामप्रसाद बिस्मिल, अशफाकउल्ला व अन्य क्रांतीकारक यांनी ही घोषणा अत्यंत लोकप्रिय केलेली होती! या सर्वांना काकोरी कटासाठी फाशीची शिक्षा झाली !! या काळात या घोषणेखालीच बंगालमध्ये हिंदू आणि मुस्लिमांचा एकत्र असा महाप्रचंड मोर्चा बंगालमध्ये निघालेला होता...!
नंतरच्या काळात क्रांतिकारकांनी ही घोषणा अनेकदा दिली आणि एक राष्ट्रीय प्रेरणा गान म्हणून काँग्रेस कमिटीच्या विस्तारित समितीने त्याचा स्वीकार केला. परंतु महर्षी अरविंद घोष तसेच रवींद्रनाथ टागोर आणि सुभाषचंद्र बोस यांच्या मते नंतरची उरलेली कडवी ही बंगाल प्रांताच्या स्तुतीकवनाची आहेत आणि त्यामुळे ती अखिल भारतीय पातळीवर ती लागू करता येणार नाहीत ! कारण त्यामध्ये केवळ बंगाली अस्मिता आणि बंगालची देवी असलेली काली माता यांचीच आळवणी किंवा भाकणूक केलेली आहे. केवळ एका राज्यापुरते आणि एकाच बंगालच्या संस्कृतीपुरते सीमित असलेले पुढील गीत हे १८८२ मधील आनंदमठ कादंबरीच्या तत्कालीन आशयाला जरी धरून असले, तरी संपूर्ण राष्ट्रव्यापी अपील त्यामध्ये असू शकत नाही..! अनेक धर्म , भाषा व प्रांत असलेल्या प्रचंड देशाचे राष्ट्रगान हे केवळ महाराष्ट्राची किंवा केवळ बंगालची किंवा गुजरातची किंवा कर्नाटकची वा तमिळनाडूची स्तुती करणारे कसे असू शकेल ??
हाच विचार महाकवी टागोर व अरविंद घोष यांनी जाहीररित्या मांडला होता. त्यामुळे प्रत्यक्ष जीवनात महाकवी असलेल्या खुद्द रवींद्रनाथ टागोर यांच्या सल्ल्यानुसार काँग्रेस समितीने 1937 साली वंदे मातरम् या गीताची पहिली दोन कडवी राष्ट्रगान म्हणून अधिकृतपणे स्वीकारली. 1937 मध्ये स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व करत असलेल्या काँग्रेस पक्षानेच याबाबतीत मोठा पुढाकार घेतला आणि या गीताची प्रथम दोन कडवी ही राष्ट्रगान म्हणून योग्य प्रकारे अंगीकृत केली ! हाच इतिहास आहे. नंतर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1950 मध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीने पुन्हा एकदा स्वतंत्र भारताचे राष्ट्रगान म्हणून समान दर्जा असलेले हे गीत त्याच्या प्रथम दोन कडव्यांना राष्ट्रगान म्हणून भारत सरकारने अधिकृत स्वीकारले!
परंतु जन_गण_मन हे खर्या अर्थाने सर्व प्रांत, भाषा यांचा लोकांचे एकसंघ राज्य म्हणून घोष करीत असल्याने अधिकृत राष्ट्रगीत तेच असेल.
ज्यांचा या विषयाशी काडीचाही संबंध नाही, ज्यांच्या पूर्वसूरींनी संपूर्ण स्वातंत्र्यलढ्यात स्वतःला बाजूला ठेवले आणि ब्रिटिशांशी प्रेमळ हस्तांदोलन केले. 1937 मध्ये बंगालमध्ये मुस्लिम लीग बरोबर सरकार स्थापन केले, त्यांच्या तथाकथित वैचारिक वारसांनी वंदे मातरमबद्दल उमाळे आणले तरीही त्याचा उपयोग नाही. प्रत्यक्ष इतिहास न वाचता त्याची मोडतोड करणे आणि त्या काळात स्वातंत्र्य लढ्यातील शीर्षस्थ असलेल्या, जनमानसावर प्रचंड प्रभाव असलेल्या आणि लढाईमध्ये स्वतः प्रचंड हाल अपेष्टा, कारावास भोगलेल्या नेत्यांबद्दल अनुद्गार काढणे आणि सध्याच्या प्रचलित प्रश्नांवरून लक्ष विचलित करणे हे उद्योग चालू आहेत.
पण आता त्याचा काहीही उपयोग होणार नाही कारण ज्या जनसमुदायाला विद्येवाचून, साक्षरते वाचून पूर्णपणे वंचित ठेवलेले होते तो प्रचंड समुदाय आता खरा इतिहास सगळा समजावून घेऊ शकतो, त्याची चिकित्सा करू शकतो आणि त्याचे शास्त्रीय पद्धतीने विश्लेषण करू शकतो!
हा इतिहास आहे आणि तो वाचला पाहिजे.
#जय_हिंद
अजित साळुंखे
(साभार - सदर लेख अजित साळुंखे यांच्या फेसबुक भिंतीवरून घेतला आहे.)