Pune Municipal Election : IT कर्मचारी संतप्त : सर्वच राजकीय पक्ष अपयशी ठरले का?
देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लावणाऱ्या IT क्षेत्राकडे अजूनही दुर्लक्ष होत असल्याची तीव्र नाराजी IT कर्मचाऱ्यांमध्ये आहे. पायाभूत सुविधा, वाहतूक कोंडी, सुरक्षित कार्यपरिसर, आणि राहणीमान या मूलभूत प्रश्नांकडे राजकीय पक्ष केवळ बैठकींपुरतेच पाहत आहेत, असा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. सुविधांचा अभाव आणि वाढता ताण यामुळे अनेक IT कर्मचारी नोकऱ्या सोडण्याचा निर्णय घेत आहेत. अशा परिस्थितीत येणाऱ्या निवडणुकीत IT कर्मचारी नेमकं कोणत्या मुद्द्यांवर मतदान करणार आहेत ? आणि त्यांच्या मुख्य मागण्या काय आहेत ? हे सर्व जाणून घेतलं आहे मॅक्सवुमनच्या संपादक प्रियदर्शिनी हिंगे यांनी IT कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधून.