दिल्लीतील राजपथाचे पंतप्रधान मोदी यांनी कर्तव्यपथ नामकरण नुकतेच केले. यावेळी ब्रिटीशांनी दिलेल्या राजपथ नावाचे नामांतर करुन ब्रिटीश गुलामीच्या मानसिकतेतून देश बाहेर पडत असल्याचा दावा केला गेला. पण इंग्रजांचा किंग्जवे आणि राजपथ यातील फरक काय आहे, राजपथ नाव कुणी दिले होते याबाबत ज्येष्ठ पत्रकार आणि खासदार कुमार केतकर यांनी एक महत्त्वाची माहिती दिली आहे. मुंबईत नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी याबाबत आपले मत व्यक्त केले.