२६ नोव्हेंबर २००८ रोजी देशाने आणि मुंबईने सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा थरार अनुभवला होता. आज इतकी वर्षे उलटूनही त्या हल्ल्याच्या जखमा ताज्या आहेत. (26/11 Terror Attack) मुंबईतील ताज महाल हॉटेलला दहशतवाद्यांनी लक्ष्य केले. या ठिकाणी मोठा बॉम्बस्फोट घडवण्यात आला. या स्फोटामुळे Taj Hotel ताज महालाचा भव्य घुमट चहूबाजूंनी आगीच्या ज्वालात लपेटलेला होता. मुंबईच्या या ऐतिहासिक वास्तूमधून सर्वत्र धुराचे तांडव सुरू होते, ज्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या हल्ल्यात अनेक निष्पाप नागरिकांनी आपला जीव गमावला, तर अनेक शूर जवान शहीद झाले. मुंबईवरील २६-११ च्या हल्ल्याचं जगभरातल्या Media मीडियानं कव्हरेज केलं होतं. मात्र, या हल्ल्याची ताज हॉटेलमधील दुसरी बाजू आज पहिल्यांदाच जगासमोर दाखवत आहोत. पाहा हा व्हिडिओ