चिक्की घोटाळा : गुन्हे दाखल झालेच पाहिजेत- धनंजय मुंडे

Update: 2021-08-13 11:28 GMT

मुंबई – भाजपच्या नेत्या आणि माजी महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. भाजप सत्तेत असताना गाजलेल्या चिक्की घोटाळा प्रकरणी पंकजा मुंडे यांची चिंता वाढली आहे. चिक्की घोटाळा प्रकरणी आतापर्यंत गुन्हा का नोंदवला गेला नाही, असा सवाल हायकोर्टाने विचारला आहे. याच मुद्द्यावरुन सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणी आपण आधीपासून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी कोर्टात धाव घेतली होती. त्यामुळे आता सर्व बाबी हळूहळू कोर्टाच्या लक्षात येत आहे, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. चिक्की घोटाळा उघड झाल्यापासून आपण सातत्याने सखोल चौकशीची मागणी केली आहे, तसेच गुन्हे दाखल केले पाहिजेत, अशी भूमिका मांडत होते, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

पंकजा मुंडे मंत्री असताना अंगणवाड्यांमधील लहान मुलांना पोषण आहार म्हणून चिक्की तसंच अन्य वस्तुंचे वाटप करण्यासाठी देण्यात आलेल्या कंत्राट प्रकरणात कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा आरोप झाला होता. या प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल का करण्यात आला नाही, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केली आहे. यासंदर्भात पुढील सुनावणी 2 सप्टेंबरला होणार आहे.

Tags:    

Similar News