मुंबई पोलिसांची ४० हजारांहुन अधिक फौज तैनात

Update: 2019-11-09 04:47 GMT

सुप्रीम कोर्ट अयोध्या खटल्यावर आज निकाल देणार आहे. सर्वत्र तणाव पूर्ण वातावरण आहे. या निकालाच्या पार्श्वभुमीवर मुंबई पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवलाय. मुंबई पोलिसांची किमान ४० हजार पेक्षा अधिक फौज तैनात राहतील. सोबतच आर.सी.पी, तसेच जी इतर विशेष फौज आहे त्यांना सुद्धा तैनात करण्यात येणार आहे.

मुंबईत City Surveillance च्या अंतर्गत ५ हजार पेक्षा अधिक कॅमेरे लावलेले आहेत. कंट्रोल रूम द्वारा सर्वत्र निगराणी ठेवली जाणार आहे. वातावरण बघून ड्रोन कॅमेऱ्याचा वापर केला जाईल. तसेच Social Media वर सुद्धा सतत पोलीसांचं लक्ष असणार आहे. अशी माहिती मुंबई पोलीस डीसीपी प्रणय अशोक यांनी दिली.

 

Similar News