सावधान! मध्य महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा यलो अलर्ट

Yellow alert for rain again in Middle Maharashtra

Update: 2025-11-02 05:00 GMT

अरबी समुद्राच्या कमी दाबाचे क्षेत्र तयार आहॆ. यामुळे पाऊस हंगामाचा कालावधी वाढतच असून नोव्हेंबर महिन्याची सुरुवातदेखील पावसाच्या माऱ्याने झाली आहे. कालपासून राज्यात अनेक भागात दिवसभर पावसाच पुन्हा आगमन झालं.

पूर्व मध्य अरबी समुद्र आणि झारखंडवरील कमी दाबाचे क्षेत्र यामुळे महाराष्ट्रासह अनेक भागांत अवकाळीचा मारा सुरूच आहे. ऑक्टोबर महिन्यानंतर नोव्हेंबर महिन्यातदेखील अधिकच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ४ आणि ५ नोव्हेंबर रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र

गेले कित्येक दिवस कायम असून पुढील २४ तासांत ते दक्षिण गुजरात ते उत्तर महाराष्ट्राकडे सरकणार आहे. याच्या प्रभावामुळे गुजरात, महाराष्ट्र गोवा राज्यातील काही भागात अवकाळीचा मारा सुरूच आहे.

Tags:    

Similar News