ROI म्हणजे काय? चांगल्या शेअर्सची निवड करताना कसा होतो फायदा?

Update: 2025-08-30 09:02 GMT

शेअर बाजारात चांगला नफा मिळवण्यासाठी योग्य कंपनीची निवड करणे महत्त्वाचे असते. परंतु कंपनीचा व्यवसाय, स्पर्धा, व्यवस्थापन यांचा अभ्यास करायला वेळ नसल्यास गुंतवणूकदारांनी सर्वात सोपा आणि प्रभावी निर्देशक पाहावा — ROI (Return on Investment).

ROI म्हणजे काय?

गुंतवणुकीतून मिळालेला नफा हा गुंतवणुकीवर केलेल्या खर्चाच्या तुलनेत किती आहे हे ROI सांगते.

हा टक्केवारीत काढला जातो आणि कंपनीची नफा कमावण्याची क्षमता दाखवतो.

ROI काढण्याची पद्धत

पद्धत १:

नफा ÷ एकूण गुंतवणूक × 100 = ROI (%)

उदाहरण:

जर एखाद्या गुंतवणुकीतून ₹20,000 नफा मिळाला आणि एकूण गुंतवणूक ₹1,00,000 असेल, तर

(20,000 ÷ 1,00,000) × 100 = 20% ROI

पद्धत २:

(गुंतवणुकीनंतरची एकूण रक्कम – मूळ गुंतवणूक) ÷ मूळ गुंतवणूक × 100

👉 उदाहरण:

मूळ गुंतवणूक ₹50,000 होती.

गुंतवणुकीनंतर रक्कम ₹65,000 झाली.

तर (65,000 – 50,000) ÷ 50,000 × 100 = 30% ROI

ROI चे महत्त्व

ROI पॉझिटिव्ह → गुंतवणूक फायद्याची ठरते.

ROI निगेटिव्ह→ गुंतवणुकीतून तोट्याची ठरू शकते

Tags:    

Similar News