डिव्हिडंड रेट आणि डिव्हिडंड यिल्ड म्हणजे काय?

What is dividend rate and dividend yield?

Update: 2025-08-29 13:36 GMT

शेअर बाजारातील अनेक कंपन्या आपल्या नफ्यातून डिव्हिडंड (लाभांश) जाहीर करतात. डिव्हिडंडमुळे गुंतवणूकदारांना कंपनीच्या नफ्यातला थेट फायदा मिळतो. मात्र या डिव्हिडंडची दोन वेगवेगळी संकल्पना आहेत—डिव्हिडंड रेट आणि डिव्हिडंड यिल्ड.

१. डिव्हिडंड रेट

कंपनीने आपल्या फेस व्हॅल्यूवर (दर्शनी किमतीवर) किती टक्के डिव्हिडंड दिला आहे हे दाखवणारा आकडा म्हणजे डिव्हिडंड रेट.

हे समजावून घेण्यासाठी एक उदाहरण पाहूयात.

समजा एखाद्या कंपनीच्या शेअरची फेस व्हॅल्यू ₹10 आहे.

कंपनीने ₹1 चा डिव्हिडंड जाहीर केला.

तर: (₹1 ÷ ₹10) × 100 = 10% डिव्हिडंड रेट


२. डिव्हिडंड यिल्ड

गुंतवणूकदाराने शेअर खरेदी करताना दिलेल्या बाजार भावाच्या तुलनेत किती डिव्हिडंड मिळतो हे दाखवणारा आकडा म्हणजे डिव्हिडंड यिल्ड.

उदाहरणार्थ

समजा कंपनीचा शेअर बाजारात ₹100 ला उपलब्ध आहे.

कंपनीने ₹1 चा डिव्हिडंड दिला.

तर: (₹1 ÷ ₹100) × 100 = 1% डिव्हिडंड यिल्ड

३. मुख्य फरक

डिव्हिडंड रेट = फेस व्हॅल्यूवर आधारित

डिव्हिडंड यिल्ड = बाजारभावावर आधारित

यामुळे, एका कंपनीचा डिव्हिडंड रेट जास्त असला तरी तिच्या शेअरच्या भावावर अवलंबून यिल्ड कमी असू शकतो.

Tags:    

Similar News