डेट-इक्विटी रेशिओ म्हणजे काय?

Update: 2025-08-29 13:12 GMT

कंपनीवर किती कर्ज आहे आणि कंपनीच्या मालकांनी (शेअरधारकांनी) किती गुंतवणूक केली आहे, याचा ताळमेळ दाखवणारा आकडा म्हणजेच डेट-इक्विटी रेशिओ.

यातून आपल्याला कंपनीची आर्थिक स्थिती समजून घेता येते.

डेट-इक्विटी रेशिओ कसा काढतात?


डेट-इक्विटी रेशिओ काढण्यासाठी सूत्र असे आहे :

एकूण देणी (Liabilities) ÷ शेअरहोल्डर्सचा हिस्सा (Equity)

कंपनीची अल्पमुदतीची व दीर्घमुदतीची कर्जे आणि दैनंदिन व्यवहारासाठी लागणारा खर्च एकत्र केल्यास एकूण देणी मिळतात.

तर, शेअरहोल्डर्सने कंपनीत गुंतवलेले भांडवल म्हणजे इक्विटी.

योग्य रेशिओ किती असावा?

१ पेक्षा कमी → कंपनीवर कर्जाचे ओझे कमी. गुंतवणुकीसाठी चांगली.


१ ते २ दरम्यान → ठीकठाक मानले जाते.


२ पेक्षा जास्त → कंपनीवर कर्ज जास्त. गुंतवणूकदारांसाठी धोक्याची घंटा.


अपवाद कोणते?

बँकिंग, वित्तीय संस्था किंवा मोठ्या उत्पादन क्षेत्रातील कंपन्यांना भांडवलाची गरज जास्त असते. त्यामुळे अशा कंपन्यांचा डेट-इक्विटी रेशिओ दोनपेक्षा जास्त असला तरी तो सामान्य मानला जातो.

Tags:    

Similar News