BMC Election Results : एकनाथ शिंदे यांनी ठाकरे बंधूंना हरवलं का?
शिवसेना (उद्धव ठाकरे ) मनसेच्या बालेकिल्ल्यात भगवा फडकवला तरीही एकनाथ शिंदेंच्या शिवसेनचं जेमतेम यश... शिंदे जिंकूनही हरले आहेत का?
Mumbai Municipal Corporation Election यंदाची मुंबई महापालिका निवडणुक अनेक अर्थानं महत्त्वाची आणि ऐतिहासिक होती. Shivsena शिवसेनेचे दोन गट पडल्यानं ठाकरे कुटुंबियांच्या तीन दशकांच्या वर्चस्वाला ब्रेक लागला. आणि मुंबई महापालिकेवर भाजपचा मोठा पक्ष म्हणून विजयी झाला. या निकालांचे विश्लेषण अनेक विचारवंत, राजकीय विश्लेषक, पत्रकार करत आहे. त्यातच टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राची बातमी एकनाथ शिंदे यांनी मनसे-शिवसेना (उद्धव ठाकरे) यांचा बालेकिल्ला जिंकूनही त्यांचं यश किरकोळ असल्याची माहिती देत आहे.
दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) किंवा काँग्रेसमधून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सेनेत सामील झालेल्या जवळपास निम्म्या माजी नगरसेवकांना मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले. अनेक ठिकाणच्या जागा महिलांसाठी आरक्षित असल्याने, माजी नगरसेवकांनी त्यांच्या पत्नींना किंवा नातेवाईकांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. ९० जागांवर निवडणूक लढवणाऱ्या शिंदे गटाला केवळ २९ जागांवर विजय मिळवता आला. अशी पोस्ट एक्स वर पत्रकार चैतन्य मारपकवार केली आहे.
या पोस्टमध्ये 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या 'टाइम्स सिटी' विभागातील बातमीचे कात्रण शेअर करत म्हटले आहे की, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने उद्धव ठाकरे गट (UBT) आणि राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) यांच्या एकत्रित ताकदीला मोठा धक्का बसवला, पण मिळालेलं यश 'जेमतेम' आहे. शिंदे सेनेने २९ जागा जिंकल्या (एकूण २२७ पैकी), तर भाजपने ८९ जागा मिळवल्या. महायुतीला (भाजप + शिंदे सेना) एकूण ११८ जागा मिळाल्या, ज्यामुळे बहुमत मिळाले.
महापालिका निवडणुकीच्या रिंगणात प्रस्थापितांनी आपल्या नातेवाईंना उतरविले होते मात्र हाती अपयश लागले.
समाधान सदा सरवणकर - शिंदेसेना प्रभाग क्र- १९४
जय मंगेश कुडाळकर - शिंदेसेना प्रभाग क्र. १६९
दीप्ती वायकर - पोतनीस - शिंदे सेना प्रभाग क्रम ७३
शिंदे गटाने उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेना आणि मनसे गटाच्या पारंपरिक बालेकिल्ल्यात (वरळी, कुर्ला आदी भाग) काही जागा जिंकल्या. उदाहरणार्थ, वरळीमध्ये माजी नगरसेवक दत्ता (दत्ताराम) नारवरकर यांच्या पत्नी वनिता नारवरकर प्रभाग क्रमांक १९७ (वरळी) मधून विजयी झाल्या आहेत. त्या शिवसेना (एकनाथ शिंदे गट)कडून निवडून आल्या आहेत. त्यांनी या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) उमेदवार रचना साळवी यांचा पराभव केला. दत्ता नारवरकर यांनी २०१७ च्या महापालिका निवडणुकीत याच प्रभागातून (वॉर्ड १९७) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तिकिटावर विजय मिळवला होता. तसेच माजी मनसे नगरसेवक संजय तुर्डे यांच्या पत्नी मीनल तुर्डे शिवसेना (शिंदे गट)कडून वॉर्ड क्रमांक १६६ (कुर्ला) येथून विजयी झाल्या आहेत.
मात्र, एकूण ९० जागांवर लढत असतानाही शिंदे सेनेचा स्ट्राइक रेट फक्त ३२% राहिला. अनेक माजी आमदार, खासदार आणि कॉर्पोरेटर्स यांच्या नातेवाइकांना तिकीट मिळाले, पण बहुतेक ठिकाणी अपयश आले. काही भागांत पूर्वीचे सेना कॉर्पोरेटर्स शिंदे गटाकडे गेले, ज्यामुळे काही जागा मिळाल्या. उदाहरणार्थ, कुर्लामधील संजय तुर्डे यांच्या पत्नी मीनल तुर्डे यांनी जागा जिंकली. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना-मनसेने मराठी हृदयस्थान असलेल्या (दादर-माहिम, वरळी, लालबाग-परळ, वडाळा) येथे बहुतेक जागा टिकवल्या.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, शिंदे सेनेने भाजपच्या पारंपरिक बालेकिल्ल्यात (वरळी) दणका दिला, पण महापौर निवडणुकीसाठी भाजपला शिंदे सेनेच्या पाठिंब्याशिवाय बहुमत मिळू शकत नाही. अनेक ठिकाणी 'मसल पॉवर' आणि 'फॅमिली टिकिट्स'चा वापर झाला, पण शिंदे गटाला मुंबईत प्रामाणिक शिवसेना म्हणून स्थापित होण्यासाठी अजून संघर्ष करावा लागेल.
बीएमसी निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात 'मराठी माणूस' आणि 'अस्मिता'चा मुद्दा पुन्हा तापला आहे. उद्धव ठाकरे गटाने शिंदे यांना 'जयचंद' संबोधले, तर शिंदे गटाने 'विकासाच्या राजकारणाला' जनतेचा पाठिंबा मिळाल्याचे सांगितले.
मुंबईच्या राजकीय इतिहासात ही निवडणूक महत्त्वाची ठरली असून, ठाकरे कुटुंबीयांच्या तीन दशकांच्या वर्चस्वाला ब्रेक लागला. तरीही, शिंदे सेनेचे मुंबईतील 'डेंट' (धक्का) फक्त सुरुवात आहे, असे राजकीय निरीक्षक म्हणत आहेत.