अहमदाबाद विमान अपघातातील सर्व २४२ जणांचा मृत्यू

Update: 2025-06-12 12:47 GMT

अहमदाबाद इथं एअर इंडियाच्या बोईंग ७८७ ड्रीमलाईनर विमानाचा अपघात झाला. यामध्ये प्रवास करणाऱ्या सर्व २४२ जणांचा मृत्यू झालाय. एका वृत्तसंस्थेनं गुजरात पोलीसांच्या हवाल्यानं ही माहिती दिलीय.

एअर इंडियाचं फ्लाईट क्रमांक AI -171 हे अहमदाबाद इथून लंडनसाठी जात होतं. त्यात १६९ भारतीय, ५३ ब्रिटिश, ७ पोर्तुगीज आणि १ कॅनेडियन नागरिक असे एकूण २३० प्रवासी होते. उर्वरित १२ जणं हे विमानातील क्रू मेंबर्स होते. याच विमानातून गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील प्रवास करत असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, त्याविषयी अजूनही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

अपघातानंतर मिळालेले शव इतक्या भयंकर अवस्थेत होते की, त्यांची ओळख पटविण्यासाठी अडचणी येत आहेत. डीएनए चाचणीनंतरच त्यांची ओळख पटवणं शक्य होणार आहे.

उड्डाण घेतल्यानंतर विमान ज्या इमारतीला धडकलं त्या मेघानी नगर इथल्या इमारतीमध्ये अहमदाबाद च्या शासकीय रुग्णालयातील डॉक्टर्स राहतात. त्यात १५ डॉक्टर्सही जखमी झाल्याची माहिती समोर येतेय.

एअर इंडियाची फ्लाईट नंबर AI-171 ने आज दुपारी १ वाजून ३८ मिनिटांनी उड्डाण केलं...अवघ्या दोन मिनिटातच त्या विमानाचा अपघात झाला. विमानतळाची भिंत आणि एअर कस्टम कार्गो कार्यालया जवळच या विमानाचा अपघात झाला. विमानाचा अपघात झाल्यानंतर संपूर्ण परिसरात काळा धूर पसरला होता.

Tags:    

Similar News