राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार का? अजित पवारांची निर्णायक बैठक; राजकीय वर्तुळात खळबळ

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. शरद पवार गट आणि अजित पवार गट पुन्हा एकत्र येणार का, याबाबत चर्चा जोर धरू लागली आहे.

Update: 2025-12-16 14:54 GMT

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. शरद पवार गट आणि अजित पवार गट पुन्हा एकत्र येणार का, याबाबत चर्चा जोर धरू लागली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी



 

एक महत्त्वाची बैठक आयोजित करणार आहेत


महापालिका निवडणुकीच्या घोषणेनंतर हालचालींना वेग

राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. 15 जानेवारी रोजी मतदान तर 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी नव्या युतींची समीकरणे तयार होत असल्याचे चित्र आहे.

काही शहरांमध्ये महायुतीतील पक्ष एकत्र निवडणूक लढवणार असले तरी पुण्यात मात्र वेगळी परिस्थिती आहे. येथे भाजपा आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) आमनेसामने जाण्याची शक्यता असून, त्यामुळे राष्ट्रवादीसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे.

पुण्यात राष्ट्रवादी एकत्र यावी, पदाधिकाऱ्यांची मागणी

पुण्यातील राष्ट्रवादी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून दोन्ही राष्ट्रवादी गटांनी एकत्र यावे, अशी जोरदार मागणी होत आहे. याच मागणीवर 17 डिसेंबर रोजी मुंबईत विशेष बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीला खासदार प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुनील तटकरे उपस्थित राहणार आहेत.

या बैठकीत पुणे महापालिका निवडणुकीसाठी शरद पवार गटासोबत युती करावी का, यावर सखोल चर्चा होणार आहे.

सकारात्मक निर्णय झाल्यास पुढील हालचाली

जर या बैठकीत युतीच्या बाजूने निर्णय झाला, तर अजित पवार गटाकडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीशी चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे. दरम्यान, अजित पवार यांनी नुकताच पुणे जिल्ह्याचा दौरा केला असून पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी उमेदवार निवड प्रक्रियेत सहभाग घेतला आहे.

या प्रक्रियेत सुमारे 700 इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत, त्यानंतर स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत आढावा बैठकही पार पडली.

आगामी राजकारणाला वळण देणारा निर्णय?

आता शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येणार का, याचा निर्णय काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. हा निर्णय पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या निकालावर निर्णायक ठरू शकतो. त्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची सुरुवात होणार का ? , याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tags:    

Similar News