Home > Fact Check > Fact Check : धीरेंद्र शास्त्रीच्या बहिणीचं मुस्लीम व्यक्तीशी लग्न, मुस्लीम धर्म स्विकारला, खोटा दावा व्हायरल

Fact Check : धीरेंद्र शास्त्रीच्या बहिणीचं मुस्लीम व्यक्तीशी लग्न, मुस्लीम धर्म स्विकारला, खोटा दावा व्हायरल

A false claim is going viral that Dhirendra Shastri's sister married a Muslim man and converted to Islam - Fact Check.

Fact Check : धीरेंद्र शास्त्रीच्या बहिणीचं मुस्लीम व्यक्तीशी लग्न, मुस्लीम धर्म स्विकारला, खोटा दावा व्हायरल
X

सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होतोय. यामध्ये एक पुरुष आणि एक महिला हातात हार घेऊन उभे आहेत. या फोटोत दिसणाऱ्या महिलेचं नाव वंदना तिवारी असल्याचा दावा केला जातोय. वंदना या बागेश्वर धाम चे प्रमुख पंडित धीरेंद्र शास्त्री यांच्या बहीण असल्याचा दावा केला जातोय. याशिवाय वंदना यांनी मुस्लीम व्यक्तीशी लग्न करुन इस्लाम धर्माचा स्विकार केल्याचा दावाही केला जातोय.

रेखा नावाच्या एका नेटिझननं हा फोटो ट्विट करत वरील दावा केलाय.




उत्तम चंद नावाच्या आणखी एका नेटिझनंही हाच दावा करत ट्विटरवर फोटो शेअर केलाय.




फेसबूक यूजर अनिलकुमार मल्होत्रा ने देखील हाच फोटो पोस्ट करत वरीलप्रमाणेच दावा केलाय.





फॅक्ट चेक

ऑल्ट न्यूजनं या व्हायरल फोटो आणि त्यामागच्या दाव्याची पडताळणी केली. गुगल रिवर्स इमेज सर्च केलं असता इंटरटेनमेंट चॅनेल झूम टीव्ही चा एक लेख त्यांना आढळला. या लेखाच्या अनुसार, फोटो दिसणाऱ्या महिलेचं नाव गहना वशिष्ठ असून तिचा विवाह सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर फैजान अन्सारी सोबत झाला...




झी न्यूज ने देखील गहना आणि फैजान च्या विवाहाची बातमी प्रकाशित केली होती. याचाच अर्थ फोटोत दिसणारी महिला ही बागेश्वार धाम चे पंडित धीरेंद्र शास्त्री यांची बहीण नाहीये.




बीबीसीच्या एका रिपोर्ट नुसार, पंडित धीरेंद्र शास्त्री यांना एकूण तीन भाऊ-बहीण आहेत. त्यामध्ये धीरेंद्र हे सर्वात मोठे आहेत. तर एका भावाचं नाव शालीग्राम आणि बहिणीचं नाव रीता गर्ग आहे. रीता यांचं लग्न झालेलं आहे. आजतक या वाहिनीनंही धीरेंद्र शास्त्री ची बहीण रीता गर्ग आणि भाऊजी कमलेश चौरहा संवाद साधला. या दोघांनीही फोटोसह व्हायरला केला जाणारा दावा फेटाळला...कमलेश चौरहा म्हणाले, “ रीता गर्ग या पंडित धीरेंद्र शास्त्री यांच्या एकुलत्या एक बहीण आहेत. २७ एप्रिल २०१५ मध्ये रीता यांचं लग्न कमलेश चौरहा यांच्यासोबत झालं होतं. कमलेश यांनी सांगितलं की ते स्वतः हिंदू ब्राह्मण आहेत.

शेवटी, कित्येक सोशल मीडिया यूजर्सने अभिनेत्री आणि मॉडेल गहना वशिष्ठ आणि फैजान अन्सारी यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत खोटा दावा केला की, बागेश्वर धाम चे पंडित धीरेंद्र शास्त्री यांच्या बहिणीनं मुस्लिम मुलाशी लग्न करुन इस्लाम धर्म स्विकारला.

Updated : 16 Dec 2025 4:37 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top