Home > मॅक्स ब्लॉग्ज > PhD Fellowships : "अजितदादा पवार भानावर या"

PhD Fellowships : "अजितदादा पवार भानावर या"

ही धोरणांची अडचण नाही, ही मानसिकतेची समस्या आहे. कर्मदरिद्री, संकुचित आणि शिक्षणविरोधी. आम्हाला कोणाशी वैयक्तिक वैर नाही. पण शिक्षणाबाबतचा हा तिरस्कार जाहीरपणे मांडला जात असेल, तर त्याला जाहीरपणे उत्तर देणं गरजेचं आहे. कारण प्रश्न पीएचडींचा नाही, तर यांच्या उच्चशिक्षणाच्या मानसिकतेचा..

PhD Fellowships : अजितदादा पवार भानावर या
X

Higher education उच्च शिक्षण घेणारी Bahujan community बहुजनांची मुलं नेहमीच राजकर्त्यांना अस्वस्थ करत आली आहेत. ही पहिली वेळ नाही. याआधीही PhD “पीएचडी करून काय दिवे लावणार?” असा अवमानकारक सवाल त्यांनी केला होता. आता “एका घरात पाच पीएचडी कशाला?” असे म्हणत त्यांनी पुन्हा एकदा आपली संकुचित मानसिकता उघडी पाडली आहे.

जरा त्या Student विद्यार्थ्याचा अभ्यास, विषय, परीक्षा आणि विद्यापीठ तपासून पहा. पण तपास करण्याआधीच निर्णय द्यायची सवय ज्यांना लागलेली असते, त्यांना सत्य दिसत नाही. कावीळ झालेल्याला जसं जग पिवळं दिसतं, तशीच अवस्था इथे आहे.

Sarathi, Barti, Mahajyoti, TRTI सारथी, बार्टी, महाज्योती, टीआरटीआय या बहुजनांच्या शिक्षणासाठी उभ्या राहिलेल्या संस्थांचा वार्षिक बजेट स्थापनेपासून आजतागायत कधीही जेमतेम ४०० कोटींच्या पुढे गेला नाही. मात्र पन्नासहून अधिक योजना एकाच संस्थेत लादल्या गेल्या. आधी योजना जाहीर करायच्या, मग मर्यादा घालायच्या, समित्या बसवायच्या, जीआर काढायचे आणि अखेर जबाबदारी मंत्रालयाच्या नावाखाली ढकलायची.

मग प्रश्न उरतो. जर सगळं मंत्रालयातूनच चालणार असेल, तर या संस्थांच्या इमारती कशासाठी? अधिकारी-कर्मचारी कशासाठी? एकच विभाग ठेवा मंत्रालयात; खर्च वाचेल.

बहुजनांची मुलं मुख्य प्रवाहात शिकू लागली की डोळ्यात खुपतं. पण हजारो कोटींची कर्जमाफी कारखानदारांना, कंपन्यांना, खासगी संस्थांना सहज मिळते. जमीन हडप करणाऱ्यांना सवलती मिळतात, स्टॅम्प ड्युटी माफ होते. मात्र विद्यार्थ्यांसाठी थोडाफार निधी द्यायचा म्हटला की हाताला लकवा बसतो.

ही धोरणांची अडचण नाही, ही मानसिकतेची समस्या आहे. कर्मदरिद्री, संकुचित आणि शिक्षणविरोधी. आम्हाला कोणाशी वैयक्तिक वैर नाही. पण शिक्षणाबाबतचा हा तिरस्कार जाहीरपणे मांडला जात असेल, तर त्याला जाहीरपणे उत्तर देणं गरजेचं आहे. कारण प्रश्न पीएचडींचा नाही, तर यांच्या उच्चशिक्षणाच्या मानसिकतेचा..

अॅड.कुलदीप आंबेकर

studenthelpinghands.org

Updated : 16 Dec 2025 2:04 PM IST
Next Story
Share it
Top