मराठा आरक्षण: ज्येष्ठ नेते गप्प का? शरद पवारांचं नाव न घेता उदयनराजेंचा सवाल

Update: 2021-05-07 08:17 GMT

राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर आज खासदार उदयनराजे भोसले यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी मराठा समाजाला सोडून सगळ्यांना आरक्षण दिलं जात आहे. यावर लोकप्रतिनिधी काहीही बोलत नाही. अशा लोकप्रतिनिधींना जनतेनं मतदार संघात फिरु देऊ नये. तसेच मराठा आरक्षणाची श्वेतपत्रीका काढण्याची मागणी करत उदयनराजे यांनी विविध पक्षातील ज्येष्ठ नेते मराठा आरक्षणावर गप्प का? असं म्हणत शरद पवार यांचे नाव न घेता सवाल केला आहे. मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची अद्यापपर्यंत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. यावर आज उदयनराजे यांनी थेट सवाल केला आहे.

आमच्या मते आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना आरक्षण द्या. अशी मागणी करताना खासदार उदयनराजे यांनी मराठा सोडून सगळ्यांना आरक्षण लागू करतायेत. मराठ्यांना बाजूला करतायेत. कोण सहन करणार आहे? असं म्हणत जरी हा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल असला तरी ज्यांना आमदार खासदार म्हणून निवडून दिलं आहे. त्यांची नैतीक जबाबदारी नाही का? एक मोरल रिस्पॉन्सबील्टी नाही का? का कोण जे ज्येष्ठ लोक आहेत. वेगवेगळ्या पक्षाचे का त्याच्यावरती भाष्य करत नाहीत? का त्याच्यावर अजुनपर्यंत एक साधं स्टेटमन नाही? असा सवाल करत शरद पवार यांचं नाव न घेता टीका केली आहे. 

Full View
Tags:    

Similar News